![]()
वडिलांसोबतच्या वादातून छ्त्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगरावरून एका तरुणाने उडी मारून आत्महत्या केली. त्याला वाचवण्यासाठी धावलेल्या वडिलांचाही त्याच डोंगरावरून पडून मृत्यू झाला. पती आणि मुलगा डोळ्यांसमोर गेला हे पाहून तिथे असलेल्या त्या मुलाच्या आईनेही त्याच डोंगरावरून काही क्षणाच्या आत उडी घेत आपले जीवन संपवले. कुणाल मुरलीधर चांदगुडे (वय 19), मुरलीधर दामोदर चांदगुडे (वय 48) आणि संगीता मुरलीधर चांदगुडे (वय 42) अशी मृतांची नावे आहेत. NEET च्या तयारीत असलेला आणि दहावीच्या गुणवत्ता यादीत आलेला हुशार कुणाल एका क्षणी स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवू शकला नाही आणि संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले. या काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात एकच प्रश्न विचारला जात आहे— हा अनर्थ कसा टाळता आला असता? कितीही आशावादी बोला. मात्र, अनेकदा आपण नैराश्याच्या खोल गर्तेत जातो. तिथून एका भयंकराचा प्रवास सुरू होतो. शरीर आणि मनाला वाळवी लागते. हे नैराश्य का येते, त्यातून बाहेर कसे पडावे. हेच सारे जाणून घेऊ राज्य मानसशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डॉ. संदीप सिसोदे यांच्याकडून. कुणाल हुशार, पण… खरे तर कुणाल हा अभ्यासात हुशार होता. तो दहावीमध्ये गुणवत्ता यादीमध्ये आला होता. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमधील त्याच्या शाळेतही त्याचे नाव ठळक अक्षरात बोर्डावर लिहिलेले होते. मात्र, इतक्या हुशार मुलाने इतका टोकाचा विचार का केला? ज्यामुळे सारे कुटुंब उद्धवस्त झाले, असा प्रश्न निर्माण होत आहे. खरेच हे नैराश्य कसे टाळता येते, मृत्यूला कसे परतावून लावता येते, हेच आता जाणून घेऊयात. नैराश्यातून बाहेर पडले की, यश आणि खऱ्या आनंदाचा मार्ग सापडतो. त्यासाठी फक्त सजग असायला हवे. मनावर लक्ष द्यावे. मग सारे काही गवसते. ‘डब्ल्यूएच’ओ म्हणते… जागतिक आरोग्य संघटना म्हणते 2025 पर्यंत मानसिक आरोग्याची समस्या सर्वात जास्त वाढणारय. त्यातही कोविडनंतर एंग्जायटी, डिप्रेशन, मुलांचा चंचलपणा, स्मरणक्षमतेवर परिणाम असे असंख्य प्रश्न वाढले आहेत. आपण स्वतःचा विचार, आत्मपरीक्षण जास्त करतोय. विचारांचा स्पीड वाढलाय. आपल्यालाला घड्याळ्याच्या आणि वेळेच्या आधी सगळं मिळालं पाहिजे. हा अट्टाहास दिसतोय. संवाद अभावाने समस्या मुलांच्या समस्या वेगळ्यात, पालकांच्या समस्या वेगळ्यात. प्रौढांच्या, तरुणांच्या, करिअरच्या समस्या वेगळ्यात. केवळ संवादाच्या अभावामुळे अनेक समस्या निर्माण होतायत आणि त्यामुळे अनेक मानसिक आजार जडतायत. गैरसमजातून व्यक्ती स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करतेय. ती व्यक्ती असे का बोलली..असे केवळ गैरसमजातून घडते. ऐकूण घेणं संवादाचा मोठा भागय. त्याला चुकीच्या गोष्टी समजल्या असतील, तर त्याच्याशी बसून बोलणं गरजेचंय. मात्र, आपण पुन्हा चुकीचा प्रतिक्रिया दिली, तर त्यातून प्रकरण टोकाला जाते. त्यामुळं तिथं संवाद साधणं गरजेचंय. ताणतणाव, नैराश्य, एंग्जायटी या सर्वापर्यंत पोहचण्याआधी संवाद क्षमता आणि ऐकूण घेण्याची क्षमता वाढवली, तर मानसिक आरोग्याला फायदाच होईल. नैराश्याची लक्षणे कोणती? नैराश्य आल्याचे कसे ओळखावे. जर आपल्या आवाक्यात कुठलीही गोष्ट राहिलेले नाही वाटते. रात्री झोप येत नाही. विस्मरण होते. स्मृतीभ्रंश होतो. माझ्या हातून सगळे सुटले आहे, ही भावना मनात घर करते. कुठल्याही गोष्टीवर लक्ष देता येत नाही. कोणाशी आपुलकी वाटत नाही. स्वतःला अस्वस्थ वाटते. एका जागी थांबावे वाटत नाही. झोपेच्या खूप समस्या सुरू होतात. हे सारे जास्त होत असेल, तर आपण नैराश्याकडे चाललो आहोत, हे समजावे. नैराश्याची हीच लक्षणे आहेत. नैराश्य का येते? नैराश्य येण्याची अनेक कारणे आहेत. आपल्या मनाचा आणि शरीराचा समन्वय कमी होणे. मनाला कमी महत्त्व देणे आणि शरीराने सतत धावपळ करत राहणे. प्रत्येक गोष्ट मिळवण्याची, साध्य करण्याची धडपड. त्याशिवाय आपल्याला समाधान वाटत नाही. म्हणजे बऱ्याचदा आपला अनैसर्गिक, भौतिक गोष्टींकडे नको तितका कल वाढते. मी पैसा कमावला. नोकरी मिळवली. एखादी गोष्ट विकत घेतली, अशी यशाची व्याख्या करतो. या साऱ्या गोष्टींमुळे नैराश्य वाढते. घड्याळाच्या काट्यावर चालणे. आपल्यासोबत घडणाऱ्या घटना आपल्याला पाहिजे तशाच घडल्या पाहिजेत. आपल्या भोवतालच्या व्यक्तींनी सुद्धा तसेच वागले पाहिजे, हा अट्टाहास नैराश्याकडे घेऊन जातो. नैराश्य कसे घालवावे? नैराश्य कमी करण्यासाठी अतिशय सोपा उपाय आहे. सगळ्या पहिले म्हणजे मन आणि शरीराचा समन्वय साधण्यासाठी आपल्याला आवडती गोष्ट करावी. आपल्याला आवडणारा छंद जोपासावा. गाणे म्हणणे असेल, वाद्य वाजवणे असेल, गप्पा मारणे असेल. पुस्तक वाचन असेल. या गोष्टी आपण प्रामुख्याने केल्याच पाहिजेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण वेळेवर जेवण केले पाहिजे. वेळेवर झोप घेतली पाहिजे. थोडे शारीरिक श्रमही करावेत. पायी चालणे. एखादा खेळ खेळणे. धावणे. ज्यामुळे मनासोबत आपले शरीरही मोकळे होईल. या गोष्टी मनासाठी इम्युनिटी बुस्टर म्हणून काम करतात. स्वतःवर प्रेम करा स्वतः वर्तमानात जगायला, विचाराने वर्तमानात राहायला आपण शिकल पाहिजे. आपण वर्तमानात आणि विचार भूतकाळ किंवा भविष्याचा करतोय, हे चालणार नाही. आपल्या मनात सतत हे ठेवा की, आपण स्वतःशी स्पर्धा करतो आहोत. आपल्यापेक्षा इतर लोक पुढे निघून गेलेत. त्यांच्याकडे मोठ्यामोठ्या गाड्या आल्यात. खरे तर असा विचार त्या-त्या व्यक्तींपुरता असतो. आपण स्वतःवरचे प्रेम जेव्हा आपण एखाद्या भौतिक गोष्टीवर करतो, तेव्हा ते आपल्यासाठी घातक असते. हे टाळण्यासाठी स्वतःवर प्रेम करा. नैराश्य पळून जाईल.
Source link
महाराष्ट्र हादरवणारे संभाजीनगरमधले ते 3 मृत्यू टळले असते:अशा प्रसंगातून मुलांना कसे सावरावे, कोणता पॉज घ्यावा, वाचा तज्ज्ञांच्या नजरेतून…!
