भिंड
मध्यप्रदेशच्या भिंड येथील राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी रात्री उशिरा भरधाव पिकअपने समोरून येणाऱ्या ट्रकला धडक दिली. या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ट्रकचालकाचाही समावेश आहे. महामार्गावरील गायींना वाचविण्याच्या प्रयत्नात ही भीषण दुर्घटना घडल्याचा दावा काही प्रत्यक्षदर्शींकडून करण्यात आला आहे. पिकअपमधील प्रवासी ग्वाल्हेर येथून उत्तरप्रदेशात परतत असताना ही दुर्घटना घडली आहे.
