Headlines

भारताला सुरुवातीलाच धक्का; सीमेवरून थायलंडच्या खेळाडूचा अफलातून थ्रो, स्मृती मंधाना आऊट


थायलंडने टॉस जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली असून, प्रतिका रावल पदार्पण करत आहे. तर दीप्ती शर्मासाठी हा १५०वा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना आहे.

ind w vs thai w asia cup 2026 shafali verma out direct hit playing 11
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : महिला आशिया चषक २०२६ मधील थायलंडविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने आक्रमक सुरुवात केली असली, तरी तिसऱ्याच षटकात संघाला पहिला धक्का बसला आहे. ३ षटकांअखेर भारताची धावसंख्या १ बाद ३८ अशी झाली होती. तुफानी फटकेबाजी करणारी स्मृती मानधना अवघ्या ८ चेंडूंत २ खणखणीत चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने १९ धावा (स्ट्राईक रेट २३७.५०) काढून दुर्दैवी रित्या धावबाद झाली.

कशी आऊट झाली स्मृती मानधना?

मिड-विकेटच्या दिशेने खेळलेल्या फ्लिक शॉटवर पहिली धाव सहज पूर्ण केल्यानंतर, दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात दोघींमध्ये (शेफाली आणि स्मृती) गोंधळ उडाला. धावताना फलंदाजांमध्ये थोडा ढिसाळपणा पाहायला मिळाला आणि याच संधीचा फायदा घेत सीमारेषेवरून अपिसारा सुवानचोनराथीने भन्नाट ‘डायरेक्ट हिट’ केला. हा थ्रो इतका अचूक होता की फलंदाजाला क्रीझमध्ये पोहोचण्याची साधी संधीही मिळाली नाही आणि भारताची सलामीची जोडी तुटली.

Maharashtra TimesTeam India Dressing Room : ही केळी खाल्लीस तर 5 विकेट फिक्स! आधी नाही बोलला पण गुपचूप खाऊन मैदानात उतरला; भारतीय ड्रेसिंग रूममधील भन्नाट किस्सा

दरम्यान, नुकत्याच झालेल्या टी-२० विश्वचषकातील निराशाजनक कामगिरीनंतरची सल भरुन काढण्यासाठी भारताला कोणत्याही परिस्थितीत हा आशिया चषक जिंकणे अनिवार्य आहे. विश्वचषकात भारतीय महिला संघाला उपांत्य फेरीही गाठता आली नव्हती. या सुमार कामगिरीनंतरही क्रिकेट बोर्डाने प्रशिक्षक आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. त्यामुळे या नव्या दमाच्या ‘प्लेइंग इलेव्हन’वर आता स्वतःला नव्याने सिद्ध करण्याचे मोठे आव्हान आहे.

सामन्यात पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष

दरम्यान, थायलंडचा संघ भारताच्या तुलनेत फारसा ताकदवान नसला तरी, क्रिकेट हा पूर्णपणे अनिश्चिततेचा आणि मैदानावरच्या ‘अ‍ॅक्शन’चा खेळ आहे. थायलंडच्या क्षेत्ररक्षकांनी आतापर्यंत मैदानात दाखवलेली चपळाई हेच दाखवते की प्रतिस्पर्ध्यांना कमी लेखण्याची चूक भारताला महागात पडू शकते. विजयाचे पारडे निश्चितच भारताच्या बाजूने आहे, पण मैदानावर सर्वोत्तम कामगिरी करणाराच संघ जिंकेल. आता उर्वरित भारतीय फलंदाज ही पडझड सावरून मोठी धावसंख्या कशी उभारतात, याकडे सर्व चाहत्यांच्या नजरा लागून आहेत.

Maharashtra TimesVaibhav Sooryavanshi Captaincy : बॅटिंग, बॉलिंगनंतर आता कॅप्टन्सीतही १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी चमकला, दमदार निर्णयाची हवा; नेमकं काय केलं?
दरम्यान, आजच्या सामन्यात भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये दोन महत्त्वपूर्ण बदल पाहायला मिळत आहेत. संघाची प्रमुख आणि आक्रमक फलंदाज जेमिमा रॉड्रिग्ज दुखापतग्रस्त असल्यामुळे आजच्या सामन्याला मुकली आहे. ही उणीव भरून काढण्यासाठी युवा आणि होतकरू खेळाडू प्रतिका रावल हिच्यावर विश्वास दाखवण्यात आला असून, आज ती आपले टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बहुप्रतीक्षित पदार्पण करत आहे.

भारतीय प्लेइंग ११

स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, प्रतिका रावल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), भारती फुलमाली, ऋचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, प्रेमा रावत, श्री चरणी, क्रांती गौड, आणि नंदनी शर्मा.

Maharashtra TimesSunil Gavskar : ‘कसोटीमध्ये क्रिकेटमध्ये नो बॉलला फ्री हिट नकोच, मला तर वाटतंय की…’; सुनील गावसकरांनी सुचवला खतरनाक पर्याय

थायलंड प्लेइंग ११

अपिसारा सुवानचोनराथी, नट्टाकन चंटम, फन्निता माया, नन्नापत कोनचारोएनकाई (यष्टीरक्षक), चानिडा सुथिरुआंग, नाओमी हॅमिल्टन, सुलेपोर्न लाओमी, नन्नाफट चाइहान, सुनिदा चतुरोंग्रट्टाना, थिपचा पुथावोंग (कर्णधार), आणि ओनिचा कामचोमफू.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा