Headlines

भारताच्या लेकींनी मैदान गाजवलं! दक्षिण आफ्रिकेला ६-१ ने लोळवलं, हॉकी वर्ल्ड कपमध्ये सर्वात मोठा विजय


Hockey World Cup 2026 Team India Womens News : एफआयएच महिला हॉकी वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा ६-१ असा धुव्वा उडवला. चीनविरुद्धचा सामना अनिर्णित राहिल्यानंतर भारताने दमदार पुनरागमन केले. या विजयासह भारतीय संघ पूल डीमध्ये अव्वल स्थानी पोहोचला आहे.

भारताचा दक्षिण आफ्रिकेवर 6-1 ने विजय
भारताचा दक्षिण आफ्रिकेवर 6-1 ने दणदणीत विजय
एफआयएच महिला हॉकी वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारतीय महिला संघाने दमदार कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेचा ६-१ असा मोठा पराभव केला आहे. या विजयासह भारताने विश्वचषकाच्या इतिहासातील आपला सर्वात मोठा विजय नोंदवला आहे.

दक्षिण आफ्रिकेला मोठ्या फरकाने हरवले

दक्षिण आफ्रिकेला मोठ्या फरकाने हरवले

एफआयएच महिला हॉकी वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारतीय महिला हॉकी संघाने आपला धडाका कायम राखला आहे. नीदरलँड्सच्या अमस्टेलवीन येथील वैगनर स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला ६-१ अशा मोठ्या फरकाने पराभूत करत स्पर्धेत आपले पहिले यश नोंदवले आहे. चीनविरुद्धचा आपला पहिला सामना २-२ असा अनिर्णित राहिल्यानंतर, भारतीय संघाने या सामन्यात सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवले. हा विजय केवळ या स्पर्धेपुरता मर्यादित नसून, तो भारताचा महिला हॉकी विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय ठरला आहे. या विजयामुळे भारतीय संघ पूल ‘डी’ च्या गुणतालिकेत चीनला मागे टाकत अव्वल स्थानावर पोहोचला आहे.

पहिल्या क्वार्टरमध्ये भारताचा दबदबा

पहिल्या क्वार्टरमध्ये भारताचा दबदबा

सामन्याच्या पहिल्या क्वार्टरमध्ये दक्षिण आफ्रिकेने भारतीय डिफेन्सच्या त्रुटींचा फायदा घेत काही चांगल्या संधी निर्माण केल्या, मात्र पहिला गोल भारतानेच केला. खेळाच्या ११ व्या मिनिटाला साक्षी राणाने आफ्रिकन बचावपटूंना चकवत चेंडू अत्यंत हुशारीने पुढे नेला. तिथे तयार असलेल्या सुनेलिता टोप्पोने अचूक टायमिंग साधत चेंडूला गोलपोस्टची दिशा दिली आणि भारताला १-० अशी सुरुवातीची आघाडी मिळवून दिली.

दुसऱ्या क्वार्टरमध्ये दोन गोलची भर

दुसऱ्या क्वार्टरमध्ये दोन गोलची भर

दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाने सामन्यावर पूर्णपणे नियंत्रण मिळवले आणि आणखी दोन गोल डागले. क्वार्टरच्या सुरुवातीलाच (दुसऱ्या मिनिटाला) नवनीत कौरने आपल्या शानदार ड्रॅग-फ्लिकचा वापर करून चेंडू थेट नेटमध्ये पाठवला आणि भारताची आघाडी २-० अशी वाढवली. त्यानंतर १० व्या मिनिटाला सुशीला चानूने मारलेल्या शॉटवर आफ्रिकन गोलकीपरने बचाव करण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र चेंडू गोलरेषेपार गेला. त्यामुळे हाफ-टाईमपर्यंत भारताने ३-० अशी भक्कम आघाडी घेतली होती.

तिसऱ्या क्वार्टरमध्ये आक्रमक खेळ

तिसऱ्या क्वार्टरमध्ये आक्रमक खेळ

तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारतीय फॉरवर्ड्सने आपला खरा आक्रमक बाज दाखवला आणि सलग तीन गोल करत सामना दक्षिण आफ्रिकेच्या आवाक्याबाहेर नेला. ८ व्या मिनिटाला बलजीत आणि नवनीत यांनी रचलेल्या उत्तम चालीवर दीपिकाने शानदार फिनिशिंग करत भारताचा चौथा गोल नोंदवला. यानंतर १४ व्या मिनिटाला लालरेमसियामीने डी-एरियामध्ये मिळालेल्या पासवर ‘रिव्हर्स-स्टिक’चा वापर करत जोरदार शॉट मारून पाचवा गोल केला. याच्या पुढच्याच मिनिटाला (१५ व्या मिनिटाला) इशिकाचा शॉट गोलपोस्टवर आदळून परत आला असता, साक्षी राणाने ‘रिबाउंड’वर टॉप-कॉर्नरमध्ये अफलातून गोल करत भारताची आघाडी ६-० अशी मजबूत केली.

शेवटच्या क्वार्टरमध्ये दक्षिण आफ्रिकेचे खाते उघडले

शेवटच्या क्वार्टरमध्ये दक्षिण आफ्रिकेचे खाते उघडले

अंतिम आणि चौथ्या क्वार्टरच्या १० व्या मिनिटाला दक्षिण आफ्रिकेच्या कायला डी वाल हिने गोल करत आपल्या संघाचे खाते उघडले. अंपायरने ‘व्हिडिओ रेफरल’द्वारे स्टिकच्या संपर्काची पडताळणी केली आणि अखेर या गोलला मान्यता दिली. या गोलमुळे भारताच्या विजयावर कोणताही परिणाम झाला नाही आणि भारताने हा सामना ६-१ अशा दणदणीत फरकाने आपल्या नावावर केला. या मोठ्या विजयामुळे भारताचा ‘गोल डिफरन्स’ सुधारला असून, इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या पुढील महत्त्वपूर्ण सामन्यापूर्वी भारतीय संघाचा आत्मविश्वास नक्कीच दुणावला आहे.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा