Headlines

बोरिया मजुमदार यांचा कॉलम:‎‎‎‎‎‎‎‎‎‎भारतीय महिला क्रिकेट संघाने‎ आता नव्या वाटेचा शोध घ्यावा‎




आयसीसी महिला टी-20 विश्वचषकाचे उपांत्य सामने‎रंगत असताना भारत मात्र अंतिम चारमध्ये पोहोचू‎शकलेला नाही. चाहत्यांसाठी ही निश्चितच‎निराशाजनक बाब आहे. गेल्या दोन आठवड्यांतील‎भारतीय संघाच्या कामगिरीकडे पाहिले तर संघ उपांत्य‎फेरीसाठी पात्र ठरला नाही, हे वास्तव स्वीकारावे‎लागेल. एखाद-दुसऱ्या खेळाडूने चांगली कामगिरी‎केली, पण संघ म्हणून सातत्यपूर्ण खेळ दिसला नाही.‎ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यांत‎याची मोठी किंमत मोजावी लागली.‎ कर्णधार हरमनप्रीत कौरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध उत्कृष्ट‎खेळी केली.भारताला सामन्यात टिकवून ठेवले. मात्र,‎इतर सामन्यांत ती गरजेपेक्षा अधिक सावध दिसली.‎दक्षिण आफ्रिकेविरुद्धही अशीच खेळी झाली असती,‎तर भारत उपांत्य फेरीत पोहोचू शकला असता. हीच ‎‎सातत्याची कमतरता संघाला महागात पडली.‎ स्मृती मानधनाने दक्षिण आफ्रिका आणि‎ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगली सुरुवात केली, पण मोठी‎खेळी करण्यात अपयश आले. हे दोन्ही सामने निर्णायक ‎‎होते. अशा वेळी संघातील प्रमुख फलंदाज अपेक्षित‎योगदान देऊ शकला नाही, ही चिंतेची बाब ठरली.‎जेमिमा रॉड्रिग्ज आणि यास्तिका भाटिया यांचा संपूर्ण‎स्पर्धेतील खेळ निराशाजनक राहिला. जेमिमाने‎स्वतःच्या कामगिरीचे आत्मपरीक्षण करण्याची गरज‎आहे. तिच्याकडे गुणवत्ता असली तरी ती सातत्याने‎मोठी खेळी करण्यात अपयशी ठरली आहे. 2025 च्या‎विश्वचषक उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेल्या‎शतकानंतर तिने अपेक्षित सातत्य राखलेले नाही.‎ दीप्ती शर्माने पाकिस्तानविरुद्ध पाच बळी घेतले. मात्र‎त्यानंतर विशेष प्रभाव पाडता आला नाही.‎ऑस्ट्रेलियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 356 वा‎बळी मिळवूनही त्यांचा विश्वचषक समाधानकारक‎ठरला नाही. ऋचा घोषनेही एका चांगल्या सामन्यानंतर‎सातत्य राखले नाही. गोलंदाजीत चारणी वगळता इतर‎कोणीही निर्णायक क्षणी पुढे आले नाही. क्षेत्ररक्षणही‎संपूर्ण स्पर्धेत सरासरीपेक्षा कमी दर्जाचे राहिले. उत्कृष्ट‎क्षेत्ररक्षक मानल्या जाणाऱ्या राधा यादवकडूनही‎महत्त्वाचे झेल सुटले. आता पुढचा मार्ग कोणता, हा‎मोठा प्रश्न आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत‎सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार असेल. मात्र खरे आव्हान‎फेब्रुवारी 2027 मधील चॅम्पियन्स ट्रॉफीचे आहे. मुख्य‎प्रशिक्षक अमोल मजूमदार टी-20 क्रिकेटच्या‎गरजेनुसार संघात कठोर निर्णय घेण्यास तयार आहेत‎का, हा प्रश्न महत्त्वाचा ठरणार आहे. 2024 आणि 2026‎या दोन्ही विश्वचषकांत गट टप्प्यातच बाहेर पडणे‎भारतीय संघासाठी निश्चितच धोक्याची घंटा आहे. दोन‎वर्षांनंतरच्या ऑलिम्पिकचा विचार करता संघाला नव्या‎कल्पना आणि नव्या दृष्टिकोनाची गरज आहे. अमोल‎मजूमदार यांच्यासाठी पुढील काही महिने अत्यंत‎महत्त्वाचे असतील. दुखापतींचा फटका संघाला बसला‎असला, तरी सक्षम राखीव खेळाडू तयार ठेवणे आणि‎नव्या खेळाडूंना संधी देणे ही प्रशिक्षकांची जबाबदारी‎असते. प्रतिभा आणि संसाधनांची कमतरता नसताना‎भारताकडून अपेक्षाही मोठ्या असणार आहेत.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎रणनीतीबाबतही अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.‎ऑस्ट्रेलियाविरुद्ध जेमिमाला ‘रिटायर्ड आऊट” का केले‎नाही? ऋचा घोषला वरच्या क्रमांकावर का पाठवले‎नाही? तिसऱ्या क्रमांकावर सतत बदल का करण्यात‎आले? डावखुरा-उजव्या हाताचा फलंदाज हा एकमेव‎निकष असू शकत नाही. तिसरा क्रमांक हा विशेष‎जबाबदारीचा असून त्या स्थानासाठी खेळाडूला‎सातत्याने संधी देणे आवश्यक असते. तसेच, गोलंदाज‎प्रेमा रावतला दोन षटकांनंतर पुन्हा गोलंदाजी का देण्यात‎आली नाही, याचाही उलगडा व्हायला हवा.‎ या प्रश्नांसह भारताचा विश्वचषकातील प्रवास संपला‎आहे. आता केवळ आत्मपरीक्षण नव्हे तर या प्रश्नांची‎ठोस उत्तरे शोधून त्यानुसार बदल अमलात आणण्याची‎वेळ आली आहे.‎ ( लेखकाचे हे वैयक्तिक मत आहे.)‎ आता भारतीय महिला संघाचे पुढील‎लक्ष्य आशियाई क्रीडा स्पर्धा असेल.‎आशियाई स्तरावर फारशी कडवी स्पर्धा‎नसल्याने भारताला सुवर्णपदक‎जिंकण्याची चांगली संधी आहे. खरे लक्ष‎फेब्रुवारी 2027 मध्ये श्रीलंकेत होणाऱ्या‎महिला चॅम्पियन्स ट्रॉफीकडे असायला‎हवे.‎



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत