Headlines

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:सत्ताधाऱ्यांनी विरोध ऐकावा,‎ विरोधकांनी मर्यादा सोडू नये




सध्या देशात आंदोलनांचे पर्व सुरू आहे. कधी विद्यार्थी, कधी शेतकरी,‎तर कधी विरोधक विविध प्रश्नांवर आंदोलन करत आहेत. प्रत्येकजण‎आपल्या पद्धतीने हे सांगण्याचा प्रयत्न करीत आहे की, सत्तेशी‎असहमती म्हणजे देशद्रोह नाही आणि सत्तेशी सहमती म्हणजे‎देशभक्तीही नाही. सत्तेला विरोध करणाऱ्यांची इच्छाही अनेकदा‎सत्तेपर्यंत पोहोचण्याचीच असते. बहुतेक जण सत्तेत आल्यानंतर‎सत्तेबाहेर असताना मांडलेली तत्त्वे विसरून जातात. सत्तेला विरोध‎करण्याची परंपरा भारतात प्राचीन आहे. महाभारताच्या युद्धकाळात‎कौरवांच्या बाजूचे मंत्री संजय यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, या‎युद्धामागे दुर्योधन आहे. दुर्योधनामागे धृतराष्ट्र आहेत. एका प्रसंगी‎पांडवांमध्येही मतभेद झाले होते. अर्जुनाने मोठा भाऊ धर्मराज‎युधिष्ठिर यांनाच या परिस्थितीसाठी जबाबदार ठरवत कठोर शब्दांत‎सुनावले होते. म्हणूनच प्रत्येक सत्ताधाऱ्याने विरोध ऐकण्याची वृत्ती‎ठेवली पाहिजे आणि प्रत्येक विरोधकानेही आपल्या आचरणातील‎मर्यादा सोडू नयेत.‎‎



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत