Headlines

थाटामाटात लग्न पार पडलं, आई-वडिलांनी मुलीबाबतची एक गोष्ट लपवली, प्रसुतीनंतर अखेर बिंग फुटलं; नेमकं काय घडलं?


Nandurbar News : महाराष्ट्रातील सोलापूलमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आई-वडिलांनीच आपल्या मुलाबाबत एक गोष्ट लपून ठेवली. मात्र प्रसुतीवेळी सर्व काही उघड झालं. नेमकं प्रकरण काय ते जाणून घ्या.

Nandurbar News
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
महेश पाटील, नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील एका गावात मागील वर्षी मार्च मध्ये एका मुलीचे लग्न तालुक्यातील एका युवकाशी झाले होते. लग्नानंतर ती गरोदर राहिली. तिचे सासरची कुटुंबीय ऊस तोडीसाठी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे गेले. त्यांच्यासोबत अल्पवयीन मुलगी ही गेली. प्रसुती वेदना झाल्याने तिला कोटेज हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. प्रसूती दरम्यान लग्नाचे बिंग फुटले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी याबाबत अल्पवयीन असल्याचे पोलीस ठाण्याला कळविल्याने करमाळा पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे. अक्कलकुवा पोलीस ठाण्यात मुलीची आई आणि पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोलापूरमधील अक्कलकुवा तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीचा गेल्यावर्षी मार्च २०२४ मध्ये तालुक्यातीलच एका युवकाशी मुलीच्या घरच्यांनी विवाह लावून देण्यात आला होता. मुलगी त्यावेळी १४ वर्षांची होती. मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही आईने तिचे लग्न लावून दिले तर युवकाने पत्नी म्हणून तिला स्वीकारले.दोन महिन्यांपूर्वी त्या मुलीच्या सासरची मंडळी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे ऊस तोडीसाठी गेले. त्यांच्यासोबत ती मुलगी गर्भवती असताना गेली. 15 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजे दरम्यान त्या मुलीला प्रसूती वेदना व्हायला लागल्या. तिला कोटेज हॉस्पिटल करमाळा येथे दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना ती अल्पवयीन असल्याचे लक्षात आल्याने. त्यांनी ही बाब पोलिसांना कळवली. तसेच त्या मुलीला सोलापूर येथील हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले.16 डिसेंबर रोजी तिने एका मुलीला जन्म दिला.
Maharashtra TimesSolapur Accident: मुलीचं लग्न ठरवण्याची लगबग, पण प्रकाश पाटलांसोबत भयंकर घटना; पत्नीला बँकेत सोडून बाहेर पडताच…; सोलापुरातील घटनेनं हळहळ
मुलीचा जबाब घेऊन सरकार पक्षातर्फे सहायक पोलिस निरिक्षक गिरिजा मस्के करमाळा पोलिस ठाण्यात प्राथमिक गुन्हा दाखल केला. प्रसुतीसाठी आलेली महिला ही अल्पवयीन असल्याचे समजताच करमाळा येथील डॉक्टरांनी क्षणाचाही विलंब न करता थेट पोलिसांना याबाबत माहिती दिली. अल्पवयीन मुलीच्या विवाहाची घटना अक्कलकुवा पोलिस ठाणे हद्दीत घडल्याने तो गुन्हा अक्कलकुवा येथे वर्ग करण्यात आला. त्यानंतर अक्कलकुवा पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.त्यानुसार मुलीची आई, तिचा पती विशाल नानसिंग ठाकरे व लग्नाला आलेले नातेवाईक यांच्याविरुद्ध अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक धीरजसिंग वसावे करीत आहेत.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा