Headlines

जीव वाचवण्यासाठी किचन-बाथरूममध्ये लपले, आगीत होरपळून २७ जणांचा मृत्यू; बँकॉकच्या पबमध्ये भीषण दुर्घटना| Maharashtra Times


Bangkok Fire: सोमवारी पहाटे थायलंडची राजधानी बँकॉकमधील एका पबला भीषण आग लागली. या आगीत २७ जणांचा होरपळून मृत्यू झाला असून ६० नागरिक गंभीर जखमी आहे. थायलंडचे पंतप्रधान अनुतिन चर्नविराकुल यांनी घटनास्थळी भेट दिली.

बँकॉक आग
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
बँककॉक: रविवारी मध्यरात्री पबमध्ये पार्टी सुरू असताना अचानक लागलेल्या भीषण आगेत २७ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. याशिवाय तब्बल ६० हून अधिका नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. थायलंडची राजधानी बँकॉकच्या एका लोकप्रिय पबमध्ये रविवारी मध्यरात्री ही आग लागली होती. आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्याचे मार्गही आगीच्या भडक्यात आले. त्यामुळे आतमध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी बाहेर पडणं अशक्य झालं. पबमधील धूरामुळे होरपळून या नागरिकांचा जागीच अंत झाला.

वर्दळीच्या परिसरात आग

उत्तर बँकॉकमध्ये वर्दळीच्या ठिकाणी हा पब असून त्याला लागूनचं रेल्वे मार्ग आहेत. त्या पबसमोर दोन शॉपिंग मॉल, चित्रपटगृह, उद्यान आणि आठवडी बाजारही आहे. परदेशी पर्यटक मोठ्या संख्येने या परिसरात भेट देतात. त्यामुळे मध्यरात्रीही या परिसरात वर्दळ कायम असते. प्राथमिक अंदाजानुसार पबच्या छतावर असलेल्या एसीमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी. ही आग पबच्या पुढच्या भागापासून सुरू झाली आणि मग वेगाने पसरू लागली. त्यानंतर किचनमधून बाथरूमपर्यंत ही आग वाढू लागली. त्यामुळे केवळ पबच्या मागच्या बाजूने बाहेर पडण्याचा मार्ग उपलब्ध होता.

“तेथे दोन अग्निशामक मार्ग आहेत, एक स्वयंपाकघराजवळ आहे. वाटेत बिअरचे क्रेट होते,” बँकॉकचे गव्हर्नर चाडचार्ट सिट्टीपंट यांनी पत्रकारांना सांगितले की, इतर अग्निशामक बाहेर पडण्याच्या मार्गात एक टेबल होता, ज्यामुळे बाहेर पडण्यास अडथळा येत होता. तसेच, आगीमुळे सर्वत्र धूर पसरला होता. या धूरामुळे अनेक नागरिकांचा मृत्यू झाला.

रोंग बियर ना लाट फ्राओ पब असे या आगीत पेटलेल्या पबचं नाव आहे. ही आग विजवण्यासाठी अग्निशमन दलाचं पहिलं पथक घटनास्थळी तातडीने दाखल झालं. त्यावेळी अनेक नागरिक पबमध्ये अडकलेलेच होते आणि इतर काही नागरिक मागच्या बाजूने पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. पुढील बाजूने बाहेर पडण्याचा प्रयत्न करणारे नागरिक जळून खाक झाले. जे वाचले ते धूरामुळे गुदमरत होते. या आगीमध्ये पबच्या मुख्य भागांचं मोठं नुकसान झालं आहे.

स्टेजवर गात असलेला एक व्यक्ती या आगीतून बचावला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व प्रथम काहीतरी जळत असल्याचा वास त्यांना आळा. त्यानंतर काही वेळातच छताला आग लागलेली दिसू लागली. ती आग पाहून अनेक जणं जीव वाचवत पळू लागले. दरम्यान, आवाज शोषूण घेण्यासाठी पबचं छत फोमचा वापर करून बांधलं गेलं होतं. हे फोम खाली पडल्यानेही अनेक नागरिकांचा मृत्यू झाला.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा