गरीब लाडक्या बहिणींना अश्रू अनावर, 92 लाख नावे यादीतून वगळली, सरकारविरोधात संताप! – 92 lakh women removed from ladki bahin scheme, anger against mahayuti government
गरीब लाडक्या बहिणींना अश्रू अनावर, 92 लाख नावे यादीतून वगळली, सरकारविरोधात संताप! – 92 lakh women removed from ladki bahin scheme, anger against mahayuti government
राज्यातील 92 लाख लाडक्या बहिणींची नावं वगळल्याने संताप व्यक्त केला जात आहे. ईकेवायसी, वयाची अट, उत्पन्न याअंतर्गत लाडकी बहिण योजनेचे नियम कडक करण्यात आलेत. यामुळे सोलापुरातील लाडक्या बहिणींनी दुःख व्यक्त केले असून त्यांना अश्रू अनावर झाले. कुटुंबासाठी महिन्याला १५०० रुपयांचा मोठा आधार वाटायचा, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. सरकार आता वेगवेगळे नियम दाखवून नाव वगळतंय अशी संतप्त प्रतिक्रिया महिलांनी दिली. सरकारला दया नाही, फक्त निवडणुकीपुरतं वापरून घेतलं, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.