ओमराजेंपाठोपाठ कैलास पाटील ठाकरेंची साथ सोडणार? पुन्हा ऑपरेशन टायगरच्या चर्चा – pratap sarnaik on operation tiger 2 and hints kailash patil joinning shiv sena
ओमराजेंपाठोपाठ कैलास पाटील ठाकरेंची साथ सोडणार? पुन्हा ऑपरेशन टायगरच्या चर्चा – pratap sarnaik on operation tiger 2 and hints kailash patil joinning shiv sena
शिवसेनेत पुन्हा एकदा फूट पडणार आणि ऑपरेशन टायगर होण्याच्या चर्चा सुरु झाल्यात आणि आता निशाण्यावर आहेत ठाकरेंचे निष्ठावंत आमदार कैलास पाटील… शिवसेना पक्षात पडलेली उभी फूट आणि त्यानंतर सत्तांतराच्या नाट्यानंतर ‘ठाकरे निष्ठावंत’ आणि ‘बंडखोर’ हे दोन गट आमनेसामने ठाकले. मराठवाड्यातील धाराशिव जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला, आणि या बंडानंतर हा जिल्हा उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला. धाराशिवमध्ये ठाकरे गटाचे मुख्यत: दोन मोठे चेहरे ओळखले जात होते एक म्हणजे खासदार ओमराजे निंबाळकर आणि दुसरे म्हणजे आमदार कैलास पाटील. या दोघांनीही कठीण प्रसंगात उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, अलिकडच्या काळात राज्यातील बदलती राजकीय समीकरणे, आणि धाराशिवच्या विकासकामांसाठी ओमराजे निंबाळकर यांनी ठाकरेंची साथ सोडली आणि आता आमदार कैलास पाटीलही त्याच वाटेवर आहेत अशा चर्चांना उधाण आलंय. कैलास पाटील ठाकरेंची साथ सोडणार का? या चर्चा नेमक्या का सुरु झाल्यात तेच या व्हिडिओत पाहू…