FDA Nashik News: अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी नागरिकांच्या प्रश्नांपर्य़ंत पोहचण्यासाठी Complaints.mahafda.in पोर्टल सुरू केलयं याला नाशिकमधून प्रतिसाद मिळाला. १२४ तक्रारींची नोंद करण्यात आली.

या तक्रारींमध्ये प्रामुख्याने निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ, दिशाभूल करणारे किंवा अपूर्ण लेबलिंग, मुदतबाह्य अन्नपदार्थांची विक्री आणि हॉटेल्समधील अस्वच्छतेबाबतच्या तक्रारींचा मोठा भरणा आहे. ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ या व्यापक मोहिमेमुळे नाशिकमधील खवय्ये आणि नागरिक आता अन्न सुरक्षेबाबत जागरूक झाले आहेत. भेसळयुक्त किंवा असुरक्षित अन्नाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी नागरिक तंत्रज्ञानाचा अत्यंत प्रभावीपणे वापर करीत आहेत.
तक्रारीचा ‘लाइव्ह ट्रॅकिंग’ पर्याय
नवीन डिजिटल पोर्टलमुळे तक्रारदाराला अर्जाचे ‘स्टेटस’ ऑनलाइन ट्रॅक करता येत आहे. तक्रारीवर तपास सुरू झाला आहे का, ‘एफडीए’च्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष पाहणीत काय आढळले, नमुने प्रयोगशाळेत पाठवले आहेत का आणि प्रशासनाने संबंधित विक्रेत्यावर काय कारवाई केली, याची सर्व माहिती पारदर्शकपणे उपलब्ध होत आहे.
येथे करा तक्रार
अन्नपदार्थांचा दर्जा, परिसरातील अस्वच्छता किंवा अन्नातील भेसळीबाबत तक्रार असल्यास complaints. mahafda.in यावर तक्रार नोंदवावी किंवा १८००२२२३६५ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनातर्फे करण्यात आले .
सेफ फूड, सेफ महाराष्ट्र या व्यापक मोहिमे अंतर्गत
विशेष ऑनलइन तक्रार पोर्टल अन्न व औषध प्रशासनाने सुरू केले यामध्ये नागरिकांनी केलेल्या तक्रारीची योग्य पडताळणी करून योग्य ती कारवाई करण्यात येत आहे.या पोर्टल द्वारे नाशिक विभागातून १२४ तक्रार नोंदवल्या गेल्या.
तक्रारीचा प्रकार व प्राप्ती तक्रारी
. निकृष्ट दर्जाचे पाकीटबंद अन्न -२८
. दूध व दुग्धजन्य पदार्थामधील भेसळ -१३
. अस्वच्छ उत्पादन हॉटेल -१६
. अन्नपदार्थांमध्ये बाह्य घटक – १२
. प्रतिबंधित अन्नपदार्थ -१२
. हॉटेलमध्ये निकृष्ट अन्न- १०
. खाद्यतेल व तुपातील भेसळ -३
. दिशाभूल करणारे लेबल- २
. मुदतबाह्य अन्नपदार्थांची विक्री -२
. इतर विविध तक्रारी – १५

