उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला नाराज केलं असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. पहिल्यांदाच जरांगेंनी एकनाथ शिंदे यांच्यावर नाराजी व्यक्त करत मोठा इशारा दिलाय. एकनाथ शिंदे डबल गेम खेळले, पण मी मराठ्यांचं वाटोळं होऊ देणार नाही, असं सांगत जरांगेंनी शिंदेंसह मुख्यमंत्री फडणवीस आणि सत्ताधारी नेते, मंत्र्यांचा समाचार घेतला.