Headlines

उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाच्या दिशेने पाऊल टाकलं तर स्वागतच:बच्चू कडूंची भूमिका, म्हणाले- हा भाजप आणि शिवसेनेचाच मूळ विचार




शिवसेना (शिंदे गट) नेते बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करत त्यांना काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी रामरक्षा पठण आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सुरू केलेल्या आंदोलनाचे स्वागत करत, “उद्धव ठाकरे हिंदुत्वाच्या दिशेने एक पाऊल टाकत असतील तर त्याचे स्वागतच आहे,” अशी भूमिका त्यांनी मांडली. तसेच शेतकरी कर्जमुक्तीच्या निर्णयात आवश्यक दुरुस्त्या करूनच अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षाही त्यांनी सरकारकडे व्यक्त केली. उपमुख्यमंत्री शिंदेंनी आता स्वतःच्या प्रकृतीलाही वेळ द्यावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीबाबत बोलताना बच्चू कडू म्हणाले की, शिंदे हे कार्यकर्त्यांसाठी नेहमी उपलब्ध असतात. पहाटेपर्यंत कार्यकर्त्यांच्या भेटी, लोकांच्या समस्या आणि बैठका अशा सततच्या धावपळीमुळे त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यांच्या मते, शिंदे यांना ताप असतानाही त्यांनी बैठकींना उपस्थिती लावली होती. चोवीस तास काम करणाऱ्या व्यक्तीने आता काही काळ स्वतःसाठीही वेळ काढला पाहिजे. शरीराला विश्रांती मिळाली नाही तर अडचणी वाढू शकतात. त्यामुळे त्यांनी लवकर बरे होऊन पुन्हा जनसेवेत सक्रिय व्हावे, अशी प्रार्थना असल्याचे कडू यांनी सांगितले. ‘उद्धव ठाकरे हिंदुत्वाच्या दिशेने येत असतील तर स्वागत’ उद्धव ठाकरे यांनी रामरक्षा पठण आणि हिंदुत्वाशी संबंधित आंदोलनाची घोषणा केल्याबाबत विचारले असता बच्चू कडू यांनी मवाळ भूमिका घेतली. ते म्हणाले की, भाजप आणि शिवसेनेचा जो मूळ विचार आहे, त्या विचारांच्या दिशेने उद्धव ठाकरे एक पाऊल टाकत असतील तर त्याचे स्वागत केले पाहिजे. त्यांनी अशाच प्रकारे पुढेही पावले टाकावीत. त्यामुळे हिंदुत्वाशी संबंधित अनेक प्रश्नांवर अधिक सकारात्मक वातावरण निर्माण होऊ शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले. शेतकरी कर्जमुक्तीत दुरुस्त्या करा; तारीख पुढे गेली तरी हरकत नाही राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमुक्तीबाबतही बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली. कर्जमुक्तीची तारीख रविवारी निश्चित करण्यात आल्याचे सांगत त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. त्यांच्या मते, दोन दिवस उशीर झाला तरी चालेल; मात्र विधान परिषदेत सुचवलेल्या दुरुस्त्यांचा समावेश करूनच अंतिम शासन निर्णय (जीआर) काढला पाहिजे. शेतकऱ्यांच्या हितासाठी आवश्यक बदल केल्यानंतरच कर्जमुक्तीची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सरकारला सूचक संदेश पत्रकार परिषदेत बच्चू कडू यांनी सरकारवर थेट टीका टाळली. मात्र मुख्यमंत्री शिंदे यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेचे स्वागत आणि शेतकरी कर्जमुक्तीतील दुरुस्त्यांची मागणी या माध्यमातून त्यांनी सरकारलाही सूचक संदेश दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. हेही वाचा… उद्धव ठाकरेंना चांगली बुद्धी सुचली!:हिंदुत्वाचे हे विचार थोडे दिवस तरी टिकवून ठेवावेत; चंद्रशेखर बावनकुळेंची जोरदार टीका अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामातील कथित अनियमितता आणि दानपेट्यांच्या चोरीच्या मुद्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाच तारखेला राज्यभरात ‘घंटानाद’ आणि ‘रामरक्षा आंदोलन’ करण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेवर आता भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार निशाणा साधला आहे. “मतांचे लांगूलचालन आणि काँग्रेससोबतची अभद्र युती टिकवण्यासाठी प्रभू रामचंद्राकडे पाठ फिरवणाऱ्या ठाकरेंना आता उशिरा का होईना चांगली बुद्धी सुचली आहे. त्यांनी हिंदुत्वाचे हे विचार थोडे दिवस तरी टिकवून ठेवावेत,” असा खोचक टोला बावनकुळे यांनी लगावला आहे. बावनकुळे यांनी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत राज्यातील विविध घडामोडींवर सविस्तर भाष्य केले. येथे वाचा संपूर्ण बातमी ‘उबाठा’चे रामरक्षा आंदोलन म्हणजे निव्वळ राजकीय नौटंकी:काँग्रेसच्या दबावामुळे उद्धव ठाकरेंनी अयोध्येतील ऐतिहासिक सोहळा टाळला; भाजपचा गंभीर आरोप मुंबईत हनुमान चालीसा पठण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आणि खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांना तुरुंगात जावे लागले, हे महाराष्ट्र विसरलेला नाही, असे म्हणत उद्धव ठाकरे यांच्या रामरक्षा आंदोलनावर भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी टीका केली आहे. ज्यांनी हनुमान चालीसा पठणालाही विरोध केला, ते आज रामरक्षेच्या नावाने आंदोलन करत आहेत. त्यामुळे हे आंदोलन श्रद्धेचे नसून राजकीय अस्तित्व टिकविण्याचा प्रयत्न आहे. उबाठाने हिंदुत्वाचा आव आणण्यापेक्षा आपल्या भूमिकेचे आत्मपरीक्षण करावे. येथे वाचा संपूर्ण बातमी राम मंदिराच्या देणग्या लुटणाऱ्यांना प्रभू श्रीराम सोडणार नाहीत:यात मोदींपासून भागवतांपर्यंत सगळेच सामील, नाना पटोलेंचा भाजप- RSS वर गंभीर आरोप अयोध्येतील राम मंदिर निर्मितीसाठी गोळा करण्यात आलेल्या देणग्यांमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत, काँग्रेसन नेते नाना पटोले यांनी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर थेट आणि गंभीर आरोप केले आहेत. या घोटाळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते सरसंघचालक मोहन भागवत यांच्यापर्यंत सर्वच जण सामील असल्याचा दावा पटोले यांनी नागपुरात बोलताना केला. तसेच, केवळ अयोध्येतच नाही, तर पंढरपूर आणि सिद्धिविनायक मंदिराच्या देणग्यांमध्येही लूट झाल्याचे ते म्हणाले. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत