उद्धव ठाकरेंनी वृद्धाश्रमात जावं, आदित्यंना अवघड दिवस; सचिन अहिरांवरून नितेश राणेंचा हल्लाबोल – sachin ahir joins eknath shinde led shiv sena nitesh rane slams uddhav thackeray
उद्धव ठाकरेंनी वृद्धाश्रमात जावं, आदित्यंना अवघड दिवस; सचिन अहिरांवरून नितेश राणेंचा हल्लाबोल – sachin ahir joins eknath shinde led shiv sena nitesh rane slams uddhav thackeray
सहा खासदारांनंतर आता उद्धव ठाकरेंचे आमदारही फुटणार असं म्हटलं जात असतानाच ठाकरेसेनेला मुंबईत मोठा धक्का बसला आहे. ठाकरेंचे अत्यंत विश्वासू नेते मानले जाणारे विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. ज्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला. यावरून भाजप नेते नितेश राणे यांनी ठाकरेंना बोचऱ्या शब्दांत डिवचलं.