Headlines

आमदार दीपक केसरकर यांचा भरगच्च कार्यक्रमाने होणार वाढदिवस साजरा


सावंतवाडी प्रतिनिधी : आमदार दीपक केसरकर यांचा वाढदिवस उद्या, शनिवार दि. १८ जुलै रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. वाढदिवसानिमित्त सकाळी १० वाजता सावंतवाडी येथील आमदार दीपक केसरकर यांच्या श्रीधर अपार्टमेंट येथील संपर्क कार्यालयात सुमारे २०० वृक्ष वाटप कार्यक्रमाने कार्यक्रमांची सुरुवात होणार आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजता केक कापून वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. तसेच जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा, रक्तदान शिबिर यांसह विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
वाढदिवसानिमित्त सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ले या तिन्ही तालुक्यांतील शहरांसह गावागावांत शिवसेना तसेच मित्रमंडळांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वेंगुर्ले येथे महाआरोग्य शिबिर, तर सावंतवाडी येथे २० जुलै रोजी महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे

दि. २० जुलैपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करून आमदार दीपक केसरकर यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी दिली. तसेच वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत