Virat Kohli News : भारतीय संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये तो टीमबसमधून उतरल्यावर एका चारचाकीने गेला. हॉटेलमध्ये न जाता विराट नेमका कुठे गेला? जाणून घ्या.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारत आणि इंग्लंडमधील तिसरा वनडे सामना उद्या म्हणजेच १९ जुलैला रविवारी पार पडणार आहे. हा सामना क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर खेळवला जाणार आहे. भारतीय संघ या ठिकाणी दाखल झाला मात्र स्टार खेळाडू टीम बसमधून उतरल्यावर आपली बॅग घेऊन निघून गेला. सामन्याला काही तास बाकी असताना विराट कोहली नेमका कुठे गेला? याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
विराट कोहली नेमका कुठे गेला?
भारतीय संघाची बस आल्यावर विराट कोहली हॉटेलमध्ये गेलाच नाही, तो उतरल्यावर तिथे एक कार आधीपासूनच उभी होती, त्यामध्ये बसून गेला. सामना सुरू व्हायला वेळ असल्याने कोहली काही कारणाने त्याच्या लंडनमधील घरी गेलाय. तसं पाहायला गेलं तर जेव्हा कोणत्याही खेळाडूच्या शहरात सामना असतो तो त्यावेळी त्याच्या घरी जाऊन येतो. अशाच प्रकारे कोहलीसुद्ध घरी गेलेला दिसत आहे. सर गॅरी सोबर्स यांच्या एक्झिटने क्रिकेट विश्व पोरकं! किंग कोहली आणि मास्टर ब्लास्टर सचिन भावुक, जुन्या आठवणींना दिला उजाळा भारत आणि इंग्लंडमधील तिसऱ्या वनडे सामन्यामध्ये दोन्ही संघांसाठी करो या मरो अशी स्थिती आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील एक-एक सामने दोन्ही संघांनी भारताने जिंकले आहेत. त्यामुळे मालिका जिंकायची असेल तर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना चमकदार कामगिरी करावी लागणार आहे. विराटने मागील सामन्यात ६५ धावांची अर्धशतकी खेळी करत सामन्यात सर्वाधिक धावा केल्या होत्या. पण भारत हा सामना जिंकू शकला नाही. त्यामुळे उद्या होणाऱ्या सामन्यामध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यावर सर्वाचं लक्ष लागलेलं असणार आहे.
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा