Rohit Sharma News : इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी कोकणातील सुपुत्र असलेल्या अविराज गावडे याची झालेली निवड अवघ्या कोकणवासी यांना अभिमानास्पद ठरली आहे. इतकंच नाही तर या स्पर्धेच्या सरावाला अविराजला क्रिकेटपटू रोहित शर्माला सरावात गोलंदाजी करण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर झालेला संवाद रोहित शर्मा याच्याजवळ झालेली ‘थेट भेट’ ही अविराज गावडे यांच्यासाठी त्याच्यातील क्रिकेटपटूला प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरले आहे.

इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळत असताना अविराजला रोहित शर्माला सरावात गोलंदाजी करण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर झालेला संवाद त्याच्यासाठी आयुष्यभराची प्रेरणा ठरला. अविराज गावडे सध्या इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट स्पर्धेत सहभागी झाला असून आपल्या दमदार कामगिरीमुळे त्याने अनेक सामन्यांत ’मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कारही पटकावले आहेत. त्याच काळात भारतीय संघाच्या इंग्लंड दौर्यापूर्वी सरावासाठी रोहित शर्मा मिडलसेक्स काऊंटीच्या मैदानावर येणार असल्याची माहिती मिळाल्याने अविराज आणि त्याचा मित्र त्याला भेटण्यासाठी मैदानावर गेले. अविराजने एनसीएचा टी-शर्ट घातल्यामुळे तेथील आयोजकांचे लक्ष त्याच्याकडे गेले. विंबल्डन क्लबचे चेअरमन सोहम यांनी अविराजची चौकशी केली. आपण लेगस्पिन गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू असल्याचे तसेच काऊंटी क्रिकेटमधील कामगिरीबद्दल सांगितल्यानंतर त्यांनी अचानक प्रश्न विचारला, रोहित शर्माला गोलंदाजी करशील का? क्षणभर अविराजही अवाक झाला.
Argentina vs Egypt Match : इजिप्तचा अर्जेंटिनाविरूद्धचा विजय रेफ्रींनी चोरला’; न्यूयॉर्कच्या महापौरांकडून बोचरी टीका, 11 मिनिटात झालेले 3 गोल
सरावाचे साहित्य घरी असल्याचे सांगितल्यावर पंधरा मिनिटांत आणू शकशील का? असा प्रश्न विचारण्यात आला. अविराजने मित्राच्या मदतीने काही मिनिटांतच घरी जाऊन किट आणले आणि पुन्हा मैदानावर हजर झाला. थोड्याच वेळात रोहित शर्मा मैदानावर दाखल झाला आणि सरावाला सुरुवात झाली. सुरुवातीला प्रचंड दडपणाखाली असलेल्या अविराजला रोहितनेच धीर देत, दडपण घेऊ नकोस, तुझा नैसर्गिक खेळ खेळ, असे सांगितले. त्यानंतर अविराजने रोहितला सलग पाच षटके लेगस्पिन गोलंदाजी केली. एका अप्रतिम चेंडूवर त्याने रोहितला त्रिफळाचीतही केले. त्यानंतर हसत रोहित म्हणाला, आता कितीही चांगली गोलंदाजी केलीस तरी मी पुन्हा बाद होणार नाही, आणि त्याप्रमाणे उर्वरित सरावात तो बाद झाला नाही. मात्र सरावानंतर त्याने अविराजच्या गोलंदाजीचे मनापासून कौतुक केले.
Team India : वैभव सूर्यवंशीवरुन निवडकर्त्यांना सुनावलं, भावनिक होऊन निर्णय घेतला; माजी क्रिकेटर रोखठोक बोलला
सराव संपल्यानंतर रोहितने अविराजशी संवाद साधला. सुरुवातीला इंग्रजीत सुरू झालेली चर्चा अविराज महाराष्ट्रातील असल्याचे समजल्यानंतर थेट मराठीत सुरू झाली. अरे वा, म्हणजे आपल्याकडचाच आहेस, असे म्हणत रोहितने अगदी आपुलकीने संवाद साधला. या वेळी रोहित शर्माने युवा क्रिकेटपटूंना यशस्वी होण्यासाठी महत्त्वाचा मंत्र दिला. फक्त चांगली लाइन-लेंथ टाकणे पुरेसे नाही. गोलंदाज असशील तर विकेट्स घ्यायच्या आणि फलंदाज असशील तर भरपूर धावा करायच्या. भारतात लाखो क्रिकेटपटू आहेत. त्यांच्यापेक्षा वेगळे दिसण्यासाठी कामगिरीच बोलली पाहिजे. मेहनतीला पर्याय नाही, असा सल्लाही त्याने दिला.
PM Narendra Modi : ऑस्ट्रेलिया दौऱ्यात PM नरेंद्र मोदींची मोठी घोषणा, बिग बॅश क्रिकेट लीगचा पहिला सामना भारतात, कधी आणि कुठे होणार?
अविराजच्या मनगटातील नैसर्गिक कौशल्याचेही रोहितने कौतुक केले. तुझ्याकडे टॅलेंट आहे. आता फक्त जास्तीत जास्त विकेट्स आणि धावा करण्यावर लक्ष केंद्रित कर. बाकी काही वेगळे करण्याची गरज नाही, असेही त्याने सांगितले. इंग्लंडमध्ये चार महिने क्रिकेटसाठी राहण्याचा निर्णय घेतल्याबद्दलही रोहितने अविराजचे कौतुक करत, तू इथे येऊन मेहनत करण्याचा मोठा निर्णय घेतलास. आता सातत्य ठेव आणि मेहनत करत राहा, असा सल्ला दिला. संवादाच्या शेवटी अविराजने रोहितला आपल्या वडिलांशी फोनवर बोलण्याची विनंती केली. रोहितने आनंदाने होकार दिला. मात्र दोनदा प्रयत्न करूनही अविराजचे वडील अनिल गावडे यांना फोन लागला नाही. त्यावर रोहित हसत म्हणाला, काही हरकत नाही, पुढच्या वेळी नक्की बोलू. या संपूर्ण प्रसंगामुळे अविराज भारावून गेला. एवढा मोठा क्रिकेटपटू असूनही रोहितची साधी राहणी, नम्र स्वभाव आणि युवा खेळाडूंना दिलेले प्रोत्साहन पाहून तो प्रभावित झाला. माझ्या आयुष्यातील हा सर्वात मोलाचा क्षण आहे. त्या रात्री मला झोपच लागली नाही. रोहित शर्मासारख्या महान खेळाडूने माझ्या खांद्यावर हात ठेवून दिलेला सल्ला आयुष्यभर विसरणार नाही, अशी भावना अविराज गावडे याने व्यक्त केली.

