Headlines

अमेरिकन लोकांना भारतीय चहाचा नाद लावणाऱ्या ‘कोलकाता चाय’मध्ये सेलिब्रिटी शेफ विकास खन्ना यांची गुंतवणूक – kolkata chai announces strategic partnership with bungalow hospitality investments michelin-starred chef vikas khanna included


Kolkata Chai Co Vikas Khanna Partnership: आपल्या कलकत्ता चहाची क्रेझ आता अमेरिका आणि न्यूयॉर्कपर्यंत पोहोचणार आहे. भारताच्या घरा-घरांमध्ये भावनिक आणि मैत्रीपूर्ण मेजवानी म्हणून सुरू झालेल्या चहाच्या संस्कृतीला नवीन उंचीवर घेऊन जाणारा नुकताच एक मोठा व्यावसायिक करार झाला आहे.

भारतातील आघाडीचा चहा ब्रँड, कोलकाता टी कंपनीने, जागतिक ख्यातीचे शेफ व मिशेलिन स्टार विजेते विकास खन्ना आणि प्रसिद्ध रेस्टॉरंट व्यावसायिक जिमी रिझवी यांच्या संयुक्त उपक्रमाने बांगला हॉस्पिटॅलिटी इन्व्हेस्टमेंट्ससोबत धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली. यामुळे दक्षिण आशियाई खाद्य आणि पेय बाजारात उलटफेर दिसून येईल.

प्रसिद्ध शेफ विकास खन्ना आणि जिमी रिझवी यांच्या मालकीच्या बांगला हॉस्पिटॅलिटी ग्रुपची ही पहिली गुंतवणूक असून दोघे नव्या गुंतवणुकीद्वारे परदेशात भारतीय खाद्यसंस्कृतीचे ब्रँड ॲम्बेसेडर बनले आहेत. विकास खन्ना म्हणाले, “आम्ही हा निर्णय घेतला आहे कारण ज्या प्रकारे आम्ही अमेरिकेसारख्या आधुनिक जगासमोर भारतीय चहाचा दर्जा आणि आमची परंपरा सादर केली आहे, ते आम्हाला आवडते.”

कोलकाता चाय कोणी सुरू केली?

2019 मध्ये अयान आणि अनी सन्याल या दोन्ही भावांनी सुरू केलेल्या ‘कोलकाता चाय’ने आपल्या अनेक कॅफेच्या शाखेद्वारे अनुभव आणि CPG चहाच्या नाविन्यपूर्ण प्रकारांमधून निष्ठावान ग्राहकवर्ग निर्माण केला. 2024 मध्ये एमी पुरस्कार विजेते अभिनेते आणि विनोदी कलाकार हसन मिन्हाज इन्व्हेस्टर व व्यावसायिक भागीदार म्हणून कंपनीत सामील झाले ज्यामुळे कंटेंट, मीडिया आणि सांस्कृतिक कथाकथनाच्या माध्यमातून ब्रँडची पोहोच अधिक वाढली.

दुसरीकडे, खन्ना आणि रिझवी यांच्या नेतृत्वाखालील बंगलो हॉस्पिटॅलिटी इन्व्हेस्टमेंट्स ही कंपनी खाद्य आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील नव्या पिढीच्या ब्रँड्समध्ये गुंतवणूकीकडे आणि त्यांच्यासोबत भागीदारी करण्यावर लक्ष केंद्रित करते.कोलकाता चाय या समूहाची पहिली गुंतवणूक असून शेफ विकास खन्ना यांचे चहासोबतचे वैयक्तिक नाते आणि कोलकाता चायच्या कलात्मकता व अस्सलतेप्रती त्यांच्या दीर्घकालीन आदरामुळे गुंतवणूक केली गेली.

अमेरिकेत केवळ चहाचा कॅफे चालवण्याऐवजी विविध प्रकारचे चहाचे मिश्रण आणि चहाचे अर्क पॅकेज करून विकून या ब्रँडने अमेरिकेतील भारतीय तसेच मूळ अमेरिकन लोकांमध्ये मोठी लोकप्रियता मिळवली.

गेल्या काही वर्षांत अमेरिकेच्या बाजारात भारतीय खाद्यपदार्थ आणि रेस्टॉरंट्सची मागणी वाढली असून या ट्रेंडचा फायदा घेत विकास खन्ना-जिमी रिझवी यांचे ‘ बांगला फूड्स ‘ आणि ‘कोलकाता टी’ या क्षेत्रात जागतिक लीडर म्हणून उदयास येणे अपेक्षित आहे.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत