Headlines

Women Property Inheritance Rules; पत्नीला माहेरून मिळालेल्या संपत्तीवर पती अन् सासरच्यांचा किती हक्क? जाणून घ्या नियम, नाहीतर अडचणीत याल


Women Property Inheritance Rules: पतीची संपत्ती किंवा मालमत्तेवर पत्नीचा अधिकार असतो, पण पतीला पत्नीच्या मालमत्तेवर हक्क असतो का? एखाद्या विवाहित महिलेला तिच्या माहेरच्यांकडून एखादी मालमत्ता किंवा कोणतीही संपत्ती मिळाली असेल तर त्याच्यावर पती किंवा सासरच्यांचा अधिकार असतो का? भारतीय कायद्यातील या तरतुदींबद्दल फार कमी लोकांना माहिती असेल ज्यामुळे लोकांमध्ये कायद्याबद्दल गोंधळणे सामान्य बाब आहे.

husband rights on wife property
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
Property Rules : आपल्या भारतीय समाजात लग्न एक पवित्र आणि मजबूत बंधन मानले जाते, पण पती-पत्नी यांच्यातील मालमत्तेबाबत अनेक संभ्रम आणि प्रश्न नेहमीच निर्माण होतात. काही लोकांचा समज आहे की जसं पत्नीला पतीच्या मालमत्तेवर अधिकार असतो, त्याप्रमाणे पतीलाही पत्नीच्या मालमत्तेवर हक्क आहे. तुम्हालाही असंच वाटत असेल तर हा तुमचा गैरसमज आहे.

पतीला पत्नीच्या मालमत्तेवर हक्क असतो का?

भारतीय कायद्यानुसार लग्नानंतर पतीला पत्नीच्या मालमत्तेवर आपोआप कोणताही हक्क मिळत नाही. पती पत्नीच्या मालकीच्या मालमत्तेचा मालक नसतो. लोकांना अनेकदा वाटतं की लग्नामुळे पतीला पत्नीची सर्व मालमत्ता मिळते, पण हा एक गैरसमज आहे. तुम्हाला माहित्येय का की पतीला पत्नीच्या मालमत्तेवर कोणताही कायदेशीर हक्क नसतो?

Maharashtra Times8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगात अपेक्षेपेक्षा जास्त मिळणार, फक्त पगार नाही HRA दणकावून वाढणार; घरभाडे भत्त्यात सुधारणा होणार
होय, न्यायालयांनी याआधी अनेकदा स्पष्ट केलं आहे की एखाद्या महिलेला तिच्या आई-वडिलांकडून मिळालेली मालमत्ता किंवा लग्नानंतर मिळणारे ‘स्त्रीधन’ ही तिची वैयक्तिक मालमत्ता असते. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांनी स्पष्ट सांगितले की पती या मालमत्तेवर मालकी हक्क सांगू शकत नाही, तर केवळ विश्वस्त असू शकतो.

म्हणजे एखादी स्त्री मूळ-बाळाशिवाय आणि मृत्युपत्राशिवाय मरण पावली, तर आई-वडिलांकडून मिळालेली कोणतीही मालमत्ता वडिलांच्या वारसांना हस्तांतरित केली जाईल, पतीला नाही. याशिवाय जोपर्यंत पती जिवंत आहे, तोपर्यंत पत्नीने कमावलेल्या कोणत्याही मालमत्तेवर दावा करू शकत नाही.

Maharashtra TimesEconomic Growth: अर्थव्यवस्थेवर मंदीची सावली, अख्खं जग संकटात जाण्याची शक्यता; भारतालाही परिणाम भोगावे लागणार, युद्धाबाबत Moody’s चा इशारा

पतीला पत्नीच्या मालमत्तेवर केव्हा हक्क मिळतो?

अशा परिस्थितीत, पत्नीने एखाद्या मालमत्तेत पतीला सह-मालक बनवले असेल किंवा पत्नीने स्वतः मालमत्ता पतीच्या नावे हस्तांतरित केली असेल तरच पती पत्नीच्या मालमत्तेवर हक्क सांगू शकतो. तसेच पतीने केवळ लग्न झालं म्हणून पत्नीच्या मालमत्तेवर मालकी हक्क सांगणे कायद्याविरुद्ध आहे.

पत्नीच्या मृत्युनंतर मालमत्तेचा वारसा कोणाला?

पत्नीच्या मृत्यूनंतर हिंदू उत्तराधिकारी कायदा, 1956 अन्वये तिची मालमत्ता विभागली जाते. भारतीय कायद्यातील तरतुदींनुसार पत्नीच्या मालमत्तेची विभागणी पती आणि मुलांमध्ये केली जाते, पण पती आणि मुलं हयातीत नसल्यास पत्नीच्या आई-वडिलांना मलमालत्तेचा वारसा हक्क मिळू शकतो. याशिवाय, पत्नीला सासरच्या मंडळींकडून मालमत्ता वारसा हक्काने मिळाली असेल, तर तिच्या मृत्यूनंतर पतीला मालमत्ता वारसा हक्काने मिळते.

Maharashtra TimesGold Silver Price: अमेरिका-इराण संघर्षात सोन्या-चांदीचा बॅण्ड वाजला; गुंतवणूकदारांचं नुकसान, खरेदीदारांची चांदी; आजचा नवीन भाव काय?

मृत्युपत्र असल्यास मालमत्तेचा वारसा कोणाला?

त्याचवेळी, महिलेने हयातीत मृत्युपत्र केले, तर मालमत्तेचे वाटप त्यानुसार केले जाईल पण, मृत्युपत्र नसल्यास कायद्याच्या कलम 14, 15 आणि 16 नुसार मालमत्तेचे वाटप केले जाते.