Headlines

Western Railway: स्टेशन मास्तरांवर श्वानांचीही जबाबदारी! सर्वोच्च न्यायालय, रेल्वे मंडळाच्या आदेशानुसार नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती – western railway tackles stray dog menace nodal officers appointed at all mumbai divison stations


Western Railway: स्थानक परिसरावर नियमित नजर ठेवणे, श्वानांचा प्रवेश रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आणि नियमित पाहणीची नोंद ठेवणेही बंधनकारक करण्यात आले आहे.

wr
नोडल अधिकारी(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
मुंबई : रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांची ये-जा, गाड्यांची धावपळ आणि फलाटांवरील लगबग ही नेहमीचीच. मात्र, याच गर्दीत गेल्या काही काळापासून भटक्या कुत्र्यांचा वावर वाढल्याने प्रवाशांच्या त्रासात भर पडली आहे. कुत्र्यांचा कधी फलाटावर फेरफटका, कधी प्रतीक्षालयात, तिकीट खिडक्यांसमोर ठाण, तर कधी खाद्यपदार्थांच्या शोधात प्रवाशांच्या मागे लागणे, अशा प्रकारांमुळे सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आता भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाला आळा घालण्याची जबाबदारी स्टेशन मास्तरांकडे सोपवण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाने प्रत्येक स्थानकासाठी स्वतंत्र नोडल अधिकारी नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाने ३० जुलै रोजी जारी केलेल्या पत्रानुसार, सर्व स्थानक अधीक्षक आणि स्टेशन मास्तर (प्रभारी) यांची भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाला प्रतिबंध करण्यासाठी नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे स्थानक परिसरात भटका कुत्रा आढळल्यास त्याबाबतची जबाबदारी संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांवर निश्चित होणार आहे.

Maharashtra TimesCabinet Meetings: मंत्रिबैठकीचा ‘महाराजा’ थाट! एअर इंडिया इमारतीत लवकरच मंत्र्यांची दालने हलवणार, 22व्या मजल्यावर होणार मसलती
भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाने रिट याचिकेत दिलेले निर्देश आणि रेल्वे मंडळाच्या सूचनांनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे स्थानकांवर भटक्या कुत्र्यांची तक्रार केल्यास ‘आम्ही काय करणार,’ असे म्हणून रेल्वे अधिकाऱ्यांना हात वर करता येणार नाहीत.

‘डॉग ड्युटी’ अंतर्गत नोडल अधिकाऱ्यांना स्थानक परिसर भटक्या कुत्र्यांपासून मुक्त ठेवावा लागणार आहे. यासाठी संबंधित महापालिका किंवा स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून भटक्या श्वानांचे व्यवस्थापन आणि आवश्यक कार्यवाही करावी लागणार आहे.
Maharashtra TimesTukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका सुरुच! आता थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या कॅन्टिनवर छापा, धक्कादायक तपशील उघड
श्वान दिसल्यास कुणाला सांगणार ?
रेल्वे स्थानकातील नोडल अधिकाऱ्याचे नाव, पद आणि संपर्क क्रमांक स्थानकाच्या प्रवेशद्वारावर ठळकपणे लावण्यात येणार आहेत. त्यामुळे स्थानक परिसरात भटका कुत्रा दिसल्यास प्रवाशांना संबंधित अधिकाऱ्याशी थेट संपर्क साधता येणार आहे. यामुळे भटक्या कुत्र्यांच्या तक्रारींवर त्वरित आणि जबाबदारीने कार्यवाही होण्याची अपेक्षा आहे.

रेल्वे अधिकाऱ्यांची जबाबदारी
-स्थानक परिसर भटक्या कुत्र्यांपासून मुक्त ठेवणे
-कुत्र्यांना हटवण्यासाठी स्थानिक प्रशासन, महापालिकेशी समन्वय साधणे
-भटक्या कुत्र्यांना रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कठोर करणे
-स्थानकाच्या प्रवेशद्वारावर नोडल अधिकाऱ्याचे नाव, संपर्क क्रमांक लावणे
-सर्वोच्च न्यायालय, रेल्वे मंडळ, मुख्यालय यांनी दिलेल्या आदेशांचे पालन करणे

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा