Washim Woman dies after giving birth to baby family accuses Doctor about delivery; बाळाच्या जन्माचा आनंद ठरला क्षणभंगुर, 24 वर्षीय मातेचा प्रसुतीनंतर मृत्यू, कुटुंब म्हणालं आमची श्वेता…
Washim Woman dies after giving birth to baby family accuses Doctor about delivery; बाळाच्या जन्माचा आनंद ठरला क्षणभंगुर, 24 वर्षीय मातेचा प्रसुतीनंतर मृत्यू, कुटुंब म्हणालं आमची श्वेता…
Woman dies after giving birth to baby : दोनच दिवसांपूर्वी नवजात बालकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आता एका बाळंतीण महिलेचा मृत्यू झाला
श्वेता पडघान(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पंकज गाडेकर, वाशिम : वाशिमच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात रुग्णांचा मृत्यू होण्याच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी एका नवजात बालकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना, नुकतीच प्रसुती झालेल्या महिलेचा मृत्यू झाल्याने येथील डॉक्टरांच्या कार्यशैलीवर कमालीचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
वाशिमच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात गरोदर महिला प्रसुती सुरक्षित होईल या विश्वासाने भरती होतात, मात्र या रुग्णालयात नवजात बालक आणि महिलांचा मृत्यू होण्याच्या घटना समोर येत आहेत. दोनच दिवसांपूर्वी एका नवजात बालकाचा जन्म झाल्यानंतर काही वेळातच मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असताना आज एका बाळंत झालेल्या महिलेचा मृत्यू झाला. श्वेता पडघान, रा. लहुजी नगर, वाशिम असे मृत्यू झालेल्या 24 वर्षीय महिलेचे नाव आहे.
नेमकं काय घडलं?
श्वेता पडघान या महिलेचे काल अकरा वाजता दरम्यान जिल्हा स्त्री रुग्णालयात सिझर झाले होते. दोन तीन तासांनंतर तिच्या पोटात वेदना होऊ लागल्याने डॉक्टरांनी तिचे ऑपरेशन केले. तिची गर्भ पिशवी काढण्यात आल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले. मात्र त्यानंतरही तिच्या प्रकृतीत सुधारणा न होता तिची प्रकृती अधिकच खालावल्याने पुढील उपचारासाठी तिला वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्या ठिकाणी श्वेताचा दुर्दैवी मृत्यू झाला. Thane Crime : निळ्या टीशर्टवाल्याने माझ्याशी… ठाण्याच्या नामांकित शाळेत 4 वर्षीय मुलीसोबत गैरकृत्य, CCTV मध्ये मात्र… डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच तिचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांकडून केला जात आहे. शव विच्छेदन करण्यासाठी तिचा मृतदेह शवागृहात ठेवण्यात आला असून जोपर्यंत दोषींवर कारवाई केली जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतल्याचे समजते.
राहुल गांधी-संजय राऊतांवर टीका ते मुंबई गोवा-महामार्ग १५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त; नितेश राणे काय म्हणाले?
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा