Headlines

Vishakha Raut Kunbi Certificate Cancelled:उद्धव ठाकरेंना धक्का, शिंदेंच्या सरवणकरांना संधी मिळणार? – vishakha raut kunbi certificate cancelled ex mumbai mayor corporator post risk sada sarvankar


Produced by: Amol Doifode|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या विद्यमान नगरसेविका विशाखा राऊत यांचे कुणबी प्रमाणपत्र रद्द झालं असून नगरसेवकपदही आता धोक्यात आलंय. त्यांनी या आधी मुंबईच्या महापौर म्हणूनही काम पाहिलं आहे. तर, दुसरीकडे राऊत यांचं कुणबी प्रमाणपत्र रद्द होताच अवघ्या दोन तासांत शिवसेनेचे सदा सरवणकर आणि त्यांच्या कन्या प्रिया सरवणकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच आता सदा सरवणकर यांचे चिरंजीव समाधान सरवणकर यांनीही विशाखा राऊत याचं कुणबी प्रमाणपत्रासाठी मागणी करणारं एक जबाब पत्र सोशल मीडियावर शेअर केलं आहे. ज्यात विशाखा राऊत यांची सही असून त्या घरकाम करत असल्याचं लिहिलेलं आहे. विशाखा राऊत यांना कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर या आदेशाविरोधात 90 दिवसांच्या आत विभागीय आयुक्तांकडे अपील करावं लागणार आहे. त्यामुळे राऊत यांच्याकडे कायदेशीर आव्हान देण्यासाठी आता तीन महिन्यांचा काळ शिल्लक आहे अन्यथा त्यांचे नगरसेवक जाण्याची दाट शक्यता आहे. तेव्हा मुंबईच्या माजी महापौर विशाखा राऊत यांचं नगरसेवकपदाचं जात प्रमाणपत्र नेमकं कुणी रद्द केलं, कुणबी जात प्रमाणपत्राबाबत समितीनं काय म्हटलंय, सदा सरवणकर एका महिन्यापूर्वी महापालिकेत येऊन काय म्हणाले होते याबाबत राऊतांनी कोणता दावा केलाय आणि जात प्रमाणपत्रांचे महापालिकेतील ८४ प्रकरणं असताना केवळ विरोधी पक्षातीलच ४ नगरसेवकांचे नगरसेवकपद रद्द करण्यासाठी निकाल लावण्यात आले का? हे सर्व मुद्दे अगदी सविस्तर पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा.#VishakhaRaut #KunbiCertificateCancelled #ExMumbaiMayor #BMCCorporator #MumbaiCorporator #UddhavThackeray #SadaSarvankar #PriyaSarvankar #EknathShinde #ThackerayFaction #ShivSena #BMC #CasteCertificate #MaharashtraPolitics #MumbaiPolitics #SamadhanSarvankar #DivisionalCommissionerAppeal #KunbiCertificate #OBCCertificate #MumbaiWard191Former Mumbai Mayor and Thackeray faction corporator Vishakha Raut’s Kunbi caste certificate has been cancelled, putting her corporator post at risk. Within two hours of the cancellation, Shiv Sena’s Sada Sarvankar and his daughter Priya met Deputy CM Eknath Shinde at his residence, sparking political buzz. Sada’s son Samadhan also shared a viral “affidavit” on social media, allegedly signed by Raut, claiming she does household work.Raut has 90 days to appeal to the Divisional Commissioner. The video examines who cancelled the certificate, what the committee said, Sada Sarvankar’s earlier statements in the BMC, Raut’s claims, and whether only four opposition corporators’ posts were targeted amid 84 pending caste certificate cases.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत