Headlines

UK Social Media Curfew: ब्रिटनमध्ये मुलांसाठी रात्री सोशल मीडिया बंद; आपोआप सुरु होणारे Video फिचर्स बंद होणार


UK Social Media Curfew: सोळा वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियाच्या वापरावर बंदी घालण्याच्या निर्णयानंतर एका महिन्याने हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

social media ban
सोशल मीडिया बंदी(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
वृत्तसंस्था, लंडन: ऑनलाइन वेळ घालवल्याने किशोरवयीन मुलांचे होणारे नुकसान रोखण्यासाठी युनायटेड किंगडम (युके) सरकारने बुधवारी एक नवीन निर्णय घेतला. या निर्णयानुसार, १६ आणि १७ वर्षे वयाच्या मुलांसाठी रात्रीच्या वेळी सोशल मीडिया वापरावर ऐच्छिक बंदी घातली जाणार आहे.

वापरकर्त्यांना अधिक वेळ स्क्रोल करण्यास भाग पाडणारी आणि एकापाठोपाठ एक आपोआप सुरू होणाऱ्या व्हिडीओसारखी फिचर्स मोठ्या किशोरवयीन मुलांसाठी आपोआप (बाय डिफॉल्ट) बंद केली जातील, असे सांगण्यात आले. परंतु, किशोरवयीन मुले ही डिफॉल्ट सेटिंग बंद करू शकतील, हे लक्षात घेऊन या उपाययोजनेच्या परिणामकारकतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Maharashtra TimesUS Iran Conflict: ट्रम्पकडून ‘तो’ प्रस्ताव मागे, USचा इराणच्या गंडस्थळावर हल्ला; ड्रोन्स, मिसाईल्सचा तुफान मारा
यामध्ये स्नॅपचॅट, टिकटॉक, युट्यूब, इन्स्टाग्राम, फेसबुक आणि एक्स यांचा समावेश असेल. परंतु व्हॉटसॲप, सिग्नल यांना यातून वगळण्यात येईल. पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्या सरकारच्या अखेरच्या काळातील योजनांपैकी एक असलेल्या या उपाययोजनेबाबत कायदा करावा लागणार आहे. त्यांचे संभाव्य उत्तराधिकारी अँडी बर्नहॅम हे या योजना पुढे नेतील, असे मानले जात आहे.

Maharashtra TimesDhurbe Elephant : आधी आई-वडील, आता सून-नातू; एकाच हत्तीने 14 वर्षात बोटे कुटुंबातील चौघांना संपवलं, घर बदलून नदीपार जाऊनही शोधलं
पाकिस्तानमध्येही बंदीचा ठराव
लाहोर : पालकांच्या संमतीशिवाय १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया खात्यांवर बंदी घालण्याची मागणी पाकिस्तानच्या पंजाब विधानसभेतील एका आमदाराने केली. प्रांतीय सरकारने देशभरात अशाच प्रकारच्या कारवाईची शिफारस करावी, असे आवाहनही केले आहे. सत्ताधारी आघाडीतील भागीदार असलेल्या इस्तेहकाम-ए-पाकिस्तान पक्षाच्या (आयपीपी) सारा अहमद यांनी मंगळवारी पंजाब विधानसभेत हा ठराव मांडला. अल्पवयीन मुलांमधील सायबरबुलिंग, ऑनलाइन लैंगिक शोषण आणि डिजिटल व्यसनाबाबतच्या वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर, पालकांच्या संमतीशिवाय असलेल्या १६ वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया खात्यांवर तातडीने बंदी घालावी, असे आवाहन या ठरावाद्वारे केले आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा