#uddhavthackeray #shivsenaubt #operationtiger #CJPprotestमहाराष्ट्राच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’च्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या सहा खासदारांना फोडून एकनाथ शिंदे गटात सामील करण्यात आले. ६ खासदार सोडून गेल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. विरोधकांनी उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा आणि बॅकफुटवर ढकलण्याचा प्रयत्न केला. मात्र, या धक्कातंत्रानंतर उद्धव ठाकरे शांत न बसता अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळतंय. गेल्या काही दिवसांत उद्धव ठाकरेंनी केवळ आपला राजकीय बचाव केला नाही, तर आक्रमक पवित्रा घेत भाजप आणि केंद्र सरकारची चौफेर कोंडी केली आहे. शिवाय एकनाथ शिंदेंसह गेलेल्या सहा खासदारांनाही सहज सोडताना दिसत नाहीयेत. आता उद्धव ठाकरेंनी आपल्या विरोधाची धार कशी तीव्र केलीये. तेच या व्हिडिओतून समजून घेऊयात..