Headlines

Tiger Shroff : बॉलिवूड गाजवल्यानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्याची फुटबॉलच्या मैदानावर एन्ट्री, लवकरच करणार डेब्यू; चाहते उत्सुक


Tiger Shroff : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ लवकरच फुटबॉल खेळात पदार्पण करणार असून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Tiger Shroff Debut In Football
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ लवकरच प्रोफेशनल फुटबॉलपटू बनणार आहे. टायगर अनेकदा कोणता ना कोणता खेळ खेळताना दिसतो. पण आता तो लवकरच एक प्रोफेशनल फुटबॉलपटू म्हणून दिसणार आहे. मुंबई फुटबॉल क्लबनं (मुंबई एफसी) टायगरला सामील केलं आहे. हा संघ यावर्षी पहिल्यांदाच ड्युरँड कप स्पर्धेत खेळणार आहे. क्लबचे संचालक झोहेब खान यांनी सोमवारी (२७ जुलै) टायगर संघात सामील झाल्याची माहिती दिली.

आशियातील सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा असलेल्या ड्युरँड कपमध्ये टायगर खेळणार असल्याच्या बऱ्याच काळापासून अफवा पसरल्या होत्या. आता या अफवांना दुजोरा मिळाला आहे. स्पोर्टस्टारशी बोलताना झोहेब खान म्हणाले की, ‘टायगर श्रॉफचं नाव संघात नोंदवलं गेलं आहे आणि आम्ही सर्व काही व्यवस्थितपणे सांभाळण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहोत. टायगरसारख्या खेळाडूसाठी आम्हाला टियर-२ आणि टियर-३ शहरांमध्ये मोठ्या सुरक्षेची आवश्यकता असेल. जवळपास खूप लोक जमू शकतात आणि त्यामुळे गोंधळ निर्माण होऊ शकतो.’
Maharashtra TimesRaja Chaudhary : ‘लग्नानंतरही एका अभिनेत्यासोबत तिचं अफेअर होतं’, श्वेता तिवारीबद्दल एक्स पती राजा चौधरीचा धक्कादायक दावा

टायगर श्रॉफ पदार्पण कधी करणार?

झोहेब खान पुढे म्हणाले की, ‘सोशल मीडियामुळे, परिस्थिती आणखी चिघळू शकते. हे लक्षात घेऊन, आम्ही एक तारीख निश्चित केली आहे. सर्व काही सुरळीत पार पडल्यास, तो एका सामन्यासाठी नक्कीच प्रवास करेल. तो सध्या संघासोबत सराव करत आहे.’

Celebrity Corner : प्रशांत दामलेंसह ‘शिकायला गेलो एक’ नाटकाच्या कलाकारांसोबत गप्पा

टायगर संघासोबत कोणत्या सामन्यासाठी प्रवास करणार आहे किंवा तो पदार्पण कधी करणार आहे, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पण, टायगर ड्युरँड कपमधून पदार्पण करू शकतो आशा आहे. त्यामुळे एक प्रोफेशनल फुटबॉलपटू म्हणून टायगर आपला पहिला सामना कधी खेळतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
Maharashtra TimesSuneil Anand : देव आनंद यांचा मुलगा सुनील आनंदचं निधन, वयाच्या 70 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप
दरम्यान, टायगरने २०२४ मध्ये एफसी क्लबची सुरुवात केली आणि तो त्याचा ब्रँड ॲम्बेसेडरसुद्धा आहे. या क्लबने भारतीय फुटबॉलमध्ये झपाट्याने ओळख मिळवली आहे. संघाने प्रथम महाराष्ट्र राज्य क्लब लीग चॅम्पियनशिप जिंकली आणि त्यानंतर आय-लीग ३ मध्ये तिसरं स्थान मिळवून, पहिल्यांदाच ड्युरँड कपसाठी पात्रता मिळवली.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा