Headlines

Suryakumar Yadav : एकच वादा सूर्या दादा! कॅप्टन्सी गेल्यावरही ICC रँकिंगमध्ये सूर्यकुमारचाच डंका, श्रेयसच्या किती पुढे? पाहा आकडेवारी


ICC Rankings 2026 : आयसीसी रँकिंग जाहीर झाली असून माजी कर्णधार सूर्युकमार यादवचा डंका पाहायला मिळाला आहे. आताचा कर्णधार श्रेयस अय्यर रँकिंगमध्ये अजूनही सूर्युकमारच्या मागे आहे. किती स्थानांनी पिछाडीवर आहे जाणून घ्या.

ICC Ranking २०२६
सूर्यकुमार यादव श्रेयस अय्यर(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : आयसीसी रँकिंग प्रत्येक बुधवारी जाहीर होते, त्यानुसार आज झालेल्या रँकिंगमध्येही टी-२० आणि वनडे फॉरमॅटमध्ये भारताच्या खेळाडूंचे वर्चस्व पाहायला मिळाले. वनडेमध्ये भारताचा कर्णधार शुभमन गिलने पहिले स्थान गाठले आहे. तर टी-२० क्रिकेटमध्ये ईशान किशन हा नंबर वन कायम राहिलाय. पण तुम्हाला माहिती का आपला सूर्या भाऊ म्हणजेच भारताचा माजी कर्णधार सूर्यकुमार यादव हा संघाबाहेर असूनही त्याचा झलवा पाहायला मिळालाय. कारण आयसीसी क्रमवारीमध्ये सूर्या तीन मालिका खेळला नसूनही भारतीय टी-२० संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर याच्यापेक्षा सरस आहे. सूर्या आणि श्रेयस कितव्या स्थानी आहे जाणून घ्या.

भारतीय संघाचा कर्णधार माजी सूर्यकुमार यादव हा टी-२० फॉरमॅटमध्ये ताज्या क्रमवारीनुसार तीन स्थानांनी नी घसरला असून १९ व्य स्थानी पोहोचला आहे. तर दुसरीकडे श्रेयस अय्यर याने सात स्थानांनी झेप घेतली असून २४ व्या स्थानी पोहोचला आहे. श्रेयसचे आता ६३० गुण झाले आहेत. श्रेयस अय्यर सूर्याला मागे टाकू शकला नाही याचे कारण म्हणजे आता पडलेल्या तीन मालिकांमध्ये भारताला फक्त एकाच मालिकेत विजय मिळवला होता. आयर्लंड आणि इंग्लंडविरूद्धच्या मालिकेत भारतीय संघाला व्हाईटवॉशचा सामना करावा लागला होता.
Maharashtra TimesICC Ranking : आयसीसी रँकिंग जाहीर; वनडेमध्ये ‘प्रिन्स’ शुभमन नंबर वन, टी-20 वैभव सूर्यवंशीची 230 स्थानांची हनुमान उडी, कितव्या स्थानी?

श्रेयस अय्यर मागे कसा पडला?

भारताने टी-२० वर्ल्ड कप २०२६ जिंकला त्यावेळी सूर्यकुमार यादव आयसीसी क्रमवारीमध्ये टॉप १० मध्ये होता. त्याआधी श्रेयस अय्यर हा गेल्या तीन वर्षांपासून संघाबाहेर असल्याने त्याची क्रमवारीमध्ये घसरण झाली होती. त्यामुळे त्याला टॉप १० मध्ये येण्यासाठी कामगिरीमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करावी लागणार आहे. आता झालेल्या तीन मालिकांमधील १० सामन्यांत श्रेयस अय्यर याने केलेल्या कामगिरीनंतर तो २४ व्या स्थानावर पोहोचला आहे. म्हणूनच श्रेयस अय्यर हा आयसीसी क्रमवारीमध्ये अजूनही सूर्यकुमार यादव याच्या मागेच आहे.
Maharashtra TimesSaransh Jain : 30 विकेट्स, 518 धावा, रणजी-दुलीप ट्रॉफीत धुमाकूळ; आता हरभजननेही सांगितली सारांश जैनची सर्वात मोठी ताकद, नेमकी काय?
दरम्यान, वनडे फॉरमॅटमध्ये शुभमन गिल याने पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी विराट कोहली आणि रोहित शर्मा आहेत. वनडे फॉरमॅटमध्ये टॉप १० यादीत हेच तीन टॉप ऑर्डरचे तीन स्टार खेळाडू आहेत. तर टी-२० मध्ये वैभव सूर्यवंशी याने २३० धावांनी झेप घेतली असून ४८ व्या स्थानी पोहोचला आहे. कमी वयात टॉप ५० मध्ये जागा मिळणारा बेबी बॉस वैभव हा जगातील एकमेव फलंदाज ठरला आहे.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा