आदल्या दिवशी, गुरुवारी, दक्षिण कोरियाचा कोस्पी निर्देशांक 6% पेक्षा जास्त घसरला. या घसरणीत AI चिप निर्माता एसके हायनिक्सचे शेअर्स 11% आणि सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे शेअर्स 8 टक्के घरंगळले. या AI-संबंधित कंपन्यांच्या उच्च मूल्यांकन आणि भविष्यातील कमाईबद्दल गुंतवणूकदारांना चिंतातुर झाले आहेत. अशा परिस्थितीत, AI विषयाशी संबंधित अलीकडील पाच प्रमुख धक्क्यांबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
अमेरिकी शेअर बाजारात सूचिबद्ध दिग्गज आयटी कंपन्यांपैकी, IBM, चे शेअर्स जुलै 2026 मध्ये तब्बल 25 टक्के घसरले आणि यामुळे कंपनीचे बाजार भांडवल जवळपास 70 अब्ज डॉलर्सनी कमी झाले. एआयच्या पायाभूत सुविधांवर केलेला प्रचंड खर्च केव्हा आणि किती लवकर लक्षणीय नफ्यात रूपांतरित होईल, याबद्दल गुंतवणूकदारांची चिंता वाढत आहे.
SaaS क्षेत्र
अँथ्रोपिकच्या नवीन एजेंटिक AI प्लॅटफॉर्ममुळे फेब्रुवारी 2026 मध्ये सॉफ्टवेअर कंपन्यांच्या स्टॉक्समध्ये विक्री सुरू झाली. यानंतर सेल्सफोर्स, ॲडोब आणि सर्व्हिसनाऊ या सारख्या कंपन्यांचे शेअर्सची मोठ्या प्रमाणात कोसळले तर, AI मुळे पारंपरिक सॉफ्टवेअर कंपन्यांच्या व्यवसाय मॉडेलमध्ये बदल होऊ शकतो, असा गुंतवणूकदारांचा समज होता.
जानेवारी 2025 मध्ये एआय चिप निर्माता एनव्हिडियाला मोठा धक्का बसला आणि एकाच दिवसात कंपनीचे बाजार भांडवल जवळपास 600 अब्ज डॉलर्सनी कमी झाले. चिनी एआय स्टार्टअप DeepSeek च्या स्वस्त एआय मॉडेलमुळे झाले. त्यानंतर गुंतवणूकदारांना भीती वाटू लागली की महागड्या एआय चिप्सची मागणी अपेक्षेपेक्षा कमी असू शकते.
अल्फाबेट आणि बिग टेक
गेल्या महिन्यात, जून 2206 मध्ये, अल्फाबेट, ॲमेझॉन, मेटा आणि मायक्रोसॉफ्ट या Tech कंपन्यांच्या शेअर्समध्ये मंदीची लाट उसळली. अल्फाबेटचे शेअर्स जवळपास 6% आणि ॲमेझॉनचे शेअर्स जवळपास 5% घसरले.
कोट्यवधी नोकरदारांची प्रतीक्षा संपली; EPFO कडून 8.25 टक्के व्याज जमा होण्यास सुरुवात; तुमच्या खात्यात पैसे आले का? पाहा कसा करायचा बॅलन्स चेक
भारतातील आयटी क्षेत्र
जागतिक बाजारात AI बद्दल वाढत्या चिंतेला भारतीय शेअर बाजारही अपवाद ठरला नाही. अलीकडच्या IBM मधील घसरणीमुळे AIबद्दल चिंता वाढली ज्यामुळे इन्फोसिस, टीसीएस, विप्रो, एचसीएलटेक, पर्सिस्टंट सिस्टीम्स, कोफोर्ज आणि LTI माइंडट्री यांसारख्या शेअर्समध्ये विक्री दिसून आली. परिणामी निफ्टी आयटी निर्देशांक जवळपास 2% घसरला, तर निफ्टी50 आणि सेन्सेक्स वाढीसह बंद झाले.
अशा परिस्थितीत, एआय क्षेत्राची दीर्घकालीन वाटचाल सध्या मजबूत मानली जात असली तरीही उच्च मूल्यांकन, नफ्याबद्दल प्रश्न आणि एआयच्या बदलत्या व्यावसायिक वातावरणामुळे या क्षेत्रात तीव्र चढ-उतार सुरू राहू शकतात.
