Headlines

Sneha Wagh : दोन लग्न अन् घटस्फोट, अध्यात्माकडे वळली मराठमोळी अभिनेत्री, वृंदावनामुळे बदललं आयुष्य; म्हणाली, ‘कोणत्याही नात्याची गरज नाही’


Sneha Wagh : मराठमोळी अभिनेत्री स्नेहा वाघचे दोन घटस्फोट झाले आहेत. वैयक्तिक आयुष्यात त्रास सहन केल्यावर अभिनेत्री आता अध्यात्माकडे वळली आहे.

Sneha Wagh On Her Spiritual Journey
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – ‘नीरजा एक नई पहचान’, ‘ज्योती’ आणि ‘वीरा’ यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये दिसलेली अभिनेत्री स्नेहा वाघ आता भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीत लीन झाली असून तिनं अध्यात्माचा स्वीकार केला आहे. वैयक्तिक आयुष्यात, स्नेहानं खूप त्रास सहन केला आहे. अभिनेत्रीचं दोनदा लग्न झालं, पण तिची दोन्ही लग्न मोडली. स्नेहा अभिनयात सक्रिय असली तरी, आता ती मुंबईऐवजी आपला बहुतेक वेळ मथुरेतील छटीकारा आणि वृंदावन येथे घालवते. स्नेहा वाघ सध्या ‘महादेव अँड सन्स’ या टीव्ही मालिकेत काम करत आहे.

अध्यात्माबद्दल काय म्हणाली स्नेहा वाघ?

नुकत्याच एका मुलाखतीत स्नेहा वाघनं तिच्या अध्यात्मिक प्रवासाबद्दल सांगितलं. अभिनेत्री म्ह्णाली की, ‘एक काळ असा होता जेव्हा माझा कोणावरही विश्वास नव्हता. मला वाटायचं की प्रत्येकजण स्वार्थी असतो. तेव्हाच मी अध्यात्म स्वीकारलं आणि माझं देवासोबत एक अनोखं नातं निर्माण झालं.’

माझ्या नवऱ्याची बायकोतील अभिजीतच्या भूमिकेमुळे टोमणे, Sukhada Khandkekar ने उलगडले धमाल किस्से

स्नेहानं पुढे सांगितलं की, एका मंदिरातून आमंत्रण मिळाल्यावर तिनं पहिल्यांदा वृंदावनला भेट दिली. सुरुवातीला तिला वाटलं की, ही एक फसवणूक असू शकते, पण या प्रवासानं तिचा दृष्टिकोन बदलला. स्नेहा म्हणाली, ‘माझं आयुष्य अवघ्या तीन दिवसांत पूर्णपणे बदललं. तिथे काही दिवस राहिल्यानंतर मला वाटलं की, मी मुंबईत राहण्याच्या योग्यतेची नाही. तिथे राहून आणि भगवान कृष्णाशी एकरूप झाल्यानं माझ्या मनाला शांतता मिळाली. भगवान कृष्णाचं ते निस्वार्थ आणि निरपेक्ष प्रेम मला तिथे सापडलं. मी इतके दिवस त्या प्रेमाच्या शोधात होते.”मला आता कोणत्याही मानवी नात्याची गरज नाही, कारण भगवान कृष्णानं माझ्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण केली आहे. मी सध्या इतकी समाधानी आहे की, मला ही परिस्थिती सोडून जायचं नाही. मी खूप समाधानी आणि चांगल्या मनःस्थितीत आहे.’ असंही स्नेहानं पुढे सांगितलं. ‘ई-टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री बोलत होती.

Maharashtra TimesTejaswini Lonari blessed with Baby Boy: तेजस्विनी लोणारीचं चाहत्यांना गोड सरप्राइज, समाधान सरवणकर झाले बाबा;घरी आला छोटा पाहुणा, खास पोस्ट व्हायरल
मुलाखतीदरम्यान लग्नाबद्दल बोलताना स्नेहा म्हणाली की, ‘मी लग्नाचे दरवाजे पूर्णपणे बंद केलेले नाहीत, पण निश्चितच माझ्या काही मर्यादा आहेत. लग्न कधीही होऊ शकतं, पण त्याबद्दल काही सांगता येत नाही.’

Maharashtra TimesTajdar Amrohi : मासिकातून वडिलांच्या अफेअरबद्दल समजलं, आईला न सांगता त्यांनी दुसरं लग्न केलं; कमाल अमरोही आणि मीना कुमारी यांच्याबद्दल लेकाचा दावा

स्नेहा वाघची दोन लग्न

स्नेहा वाघनं वयाच्या १९ व्या वर्षी अभिनेता आविष्कार दरवेकरशी पहिलं लग्न केलं, पण घरगुती हिंसाचारामुळे त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर, स्नेहानं २०१५ मध्ये इंटिरियर डिझायनर अनुराग सोलंकीशी लग्न केलं, पण त्यांचाही २०१६ मध्ये घटस्फोट झाला. त्यानंतर स्नेहानं तिच्या दुसऱ्या पतीवर मानसिक छळ आणि अत्याचाराचा आरोप केला.

Maharashtra TimesPrajakta Mali : प्राजक्ता माळीचं चाहत्यांना खास सरप्राइज, नव्या लूकसह शेअर केली आनंदाची बातमी
दरम्यान, स्नेहाच्या कामाबद्दल सांगायचं तर तिनं ‘अधूरी एक कहानी’ या मालिकेतून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर अभिनेत्री ‘एक वीर की अरदास वीरा’, ‘ज्योती’, ‘चंद्रगुप्त मौर्य’, ‘मेरे साई – श्रद्धा और सबुरी’, ‘ना उम्र की सीमा हो’ आणि ‘नीरजा – एक नई पहचान’ यांसारख्या मालिकांमध्ये झळकली आहे.