Headlines

Sindhudurg Malvan 20 Year Old Girl Ends her Life; लेकीला शोधण्यासाठी आईची पळापळ, घराजवळील आंब्याच्या झाडाजवळ पाहिलं तर…; तरुणीचं टोकाचं पाऊल


Sindhudurg Crime News : सिंधुदुर्गमधील मालवण तालुक्यात एक खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. या घटनेनं संपूर्ण शहर सुन्न झालं आहे.

Sindhudurg Crime News
मालवण तरुणीची आत्महत्या(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
प्रसाद रानडे, सिंधुदुर्ग : अलीकडे तरुणाईमध्ये आत्महत्या करण्याचं प्रमाण हे प्रचंड प्रमाणात वाढलं आहे. अशीच एक दुर्दैवी आत्महत्येची घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण तालुक्यात घडली आहे. एका 20 वर्ष तरुणीने आत्महत्या केल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

नाजिया नेहमी शांत असायची

मालवण तालुक्यात कुंभारमाठ येथील नाजिया सनाऊला खान (वय 20) या तरुणीने घराच्या मागील बाजूस आंब्याच्या झाडाला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी रात्री उघडकीस आली. तिच्या आत्महत्येचं कारण समजू अद्याप समजू शकलेले नाहीय. नाजिया ही दोन महिन्यांपासून नोकरीच्या प्रयत्नात होती. ती घरात नेहमी शांत असायची. शनिवारी रात्री नाजियाची आई घरात नमाज पठाण करत होती, तर ती बाहेरच्या खुर्चीवर बसली होती. वडील आणि भाऊ वायरी येथे नमाज पठण करण्यास गेले होते.
Maharashtra TimesPune Crime : CBI अधिकारी असल्याचं भासवलं, ज्येष्ठाची पावणेअकरा कोटींची फसवणूक, एटीएमला गेले अन् अडकले; पुण्यात काय घडलं?

आईच्या डोळ्यासमोर…

दरम्यान, आईने नमाज पठण करून झाल्यावर नाजिया हिला शोधण्यास सुरुवात केली असता ती घरानजीकच्या आंब्याच्या झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळली. तिचे वडील आल्यावर त्यांनी मालवण पोलिसांना याची माहिती दिली. उपनिरीक्षक प्रतिज्ञा खोत, सुशांत पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची नोंद मालवण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास मालवण पोलीस करत आहेत.
Maharashtra TimesSudhakar Shrotri : अभिनेते पुष्कर श्रोत्री यांना पितृशोक, ज्येष्ठ वृत्तपत्र वितरक सुधाकर श्रोत्री यांचं निधन

आठवीतील विद्यार्थ्याची तलावात बॉडी

इयत्ता आठवीतील मुलाची त्याच्या मित्रांनीच हत्या केल्याची घटना भांडुपमध्ये उघडकीस आली आहे. सिद्धार्थ लोंढे (१४) असे या मृत मुलाचे नाव असून याप्रकरणी तीन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. शवविच्छेदन अहवालामुळे हत्येचे बिंग फुटले. भांडुप पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुळशेत पाडा परिसरात सिद्धार्थ वास्तव्यास होता. २२ फेब्रुवारीला दुपारी तीनच्या सुमारास तो खेळायला जातो सांगून घराबाहेर पडला. रात्री उशिरापर्यंत सिद्धार्थ घरी न आल्याने पालकांनी त्याची शोधाशोध सुरू केली. मात्र, कुठेच न सापडल्याने अखेर पालकांनी भांडुप पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून शोध सुरू केला. पोलिसांकडून गुन्ह्याचा तपास आणि शोध सुरू असतानाच मुलुंड पोलिसांच्या हद्दीमध्ये विहार तलावाजवळ २३ फेब्रुवारीला सिद्धार्थचा मृतदेह सापडला.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा