Sindhudurg Kankavli Famous Construction Businessman Sushant Dalvi Killed Body Found at Unknown Location; प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाचा संशयास्पद मृत्यू, अज्ञातस्थळी पार्थिव आढळलं; डोक्यावर गोळी मारल्याचे निशाण
Sindhudurg Kankavli Famous Construction Businessman Sushant Dalvi Killed Body Found at Unknown Location; प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाचा संशयास्पद मृत्यू, अज्ञातस्थळी पार्थिव आढळलं; डोक्यावर गोळी मारल्याचे निशाण
Sindhudurg Builder Sushant Dalvi Killed : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुशांत दळवी यांचं पार्थिव अत्यंत संशयास्पद स्थितीत आढळून आलं आहे. या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात भितीचं वातावरण पसरलं आहे.
कणकवली बिल्डर सुशांत दळवी हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाचा संशयास्पद पार्थिव आढळल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेचं वृत्त कळताच कणकवली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून प्रकरणाचा पंचनामा करण्याचं काम सुरू आहे. सुशांत जनार्दन दळवी (मूळ राहणार कळसुली तालुका, कणकवली) असं या बांधकाम व्यवसायिकाचं नाव आहे. या घटनेचं वृत्त कळताच घटनास्थळी अप्पर पोलीस अधिक्षक नयोमी साटम, पोलीस उपविभाग अधिकारी घनश्याम आढाव यांच्यासह दाखल झाले आहेत.
डोक्यावर गंभीर इजा
सुशांत दळवी यांच्या पार्थिवाच्या डोक्यावर गंभीर इजा झाली असून बंदुकीने गोळी लागल्यासारखी निशाणी असल्याची चर्चा आहे. प्रथमदर्शनी हा मृत्यू संशयास्पद हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कणकवली शहरातील सेंट्रींगचे कॉन्ट्रॅक्टर सुशांत दळवी यांचा अज्ञात व्यक्तीने गोळी झाडून हत्या केल्याचा संशय असून त्यांचं पार्थिव आज सकाळी मुरे डोंगरी येथे मिळालं आहे. सुशांत दळवी हे कणकवली शहरातील बांधकाम व्यवसायिक आहेत. या सगळ्या प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यात भितीचं वातावरण पसरलं आहे. हा मृत्यू घातपात आहे की, अजून काही, याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळाली नाहीय. तरी या मृत्यू प्रकरणाचं गूढ वाढलं आहे. हा मृत्यू नेमका कशामुळे झाला याची माहिती पोलीस घेत आहेत. या प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली आहे. Pune Crime: पुण्यात प्रेमविवाहाचा भयंकर शेवट; तरुणाने रिक्षात केली आयुष्याची अखेर, पत्नीच्या त्रासाचा आरोप
घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त
कणकवली पोलीस निरिक्षक तेजस नलवडे, गुन्हा अन्वेशनचे उपनिरिक्षक अनिल हाडळ, फॉरेन्सिक लॅबचे पथक, गुन्हा अन्वेशनचे पथक, जिल्हा गुन्हा अन्वेषण शाखेचे पथक आदी तपासपथके घटनास्थळी दाखल आहेत. दरम्यान, सुशांत दळवी यांची हत्या झाल्याच्या घटनेची माहिती कळताच माजी आमदार वैभव नाईक, नगराध्यक्ष संदेश पारकर, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, हरकुळ बुद्रुक सरपंच आनंद ठाकूर, वागदे सरपंच संदीप सावंत, सचिन सावंत, सचिन आचरेकर, जावेद शेख, आतीष जेठे, विशाल डामरी, राज नलावडे आधी नागरिक घटनास्थळी दाखल झाले आहेत. पुढील तपास सुरु आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा