Headlines

Shivsena city chief pappu relekar threat to bus employee using yogesh kadams name; स्टाफसह तुलाही जाळून टाकेन; शिवसेना शहरप्रमुखाची बस कर्मचार्‍याला धमकी


मुंबई: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या शहरप्रमुखाने गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या नावाचा वापर करून एसटी महामंडळाने खाजगी तत्वावर नेमलेल्या एजन्सीच्या कर्मचाऱ्याला धमकी दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दापोली एसटी आगारात ‘ई’ बसेसचे व्यवस्थापन करणाऱ्या मोरया ट्रॅव्हल्स एजन्सीच्या कर्मचाऱ्याला ही धमकी देण्यात आल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

कर्मचाऱ्याला धमकी दिल्याची ही कथित ऑडिओ क्लिप दापोलीचे शिवसेनेचे शहरप्रमुख प्रसाद उर्फ पप्पू रेळेकर यांची असल्याचे समजते. या ऑडिओ क्लिपमध्ये सदर कर्मचाऱ्याला थेट जीवे मारण्याची धमकी दिल्याचं स्पष्ट होत आहे.

नेमकं काय आहे ऑडिओ क्लिपमध्ये?

व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये टॅव्हल्स एजन्सीच्या कर्मचाऱ्याला धमकी देताना पप्पू रेळेकर यांनी म्हटलं आहे की, “जेवढ्या ड्युटीला अलोकेशनला कॅन्सल केल्यास तेवढ्या जर केल्या नाहीस तर मी रात्रीपासून गाड्या फोडून टाकीन. माझ्यासारखा वाईट कोणी नाही. कोण योगेश गौरत त्याला सांग माझा फोन आहे. माझा आदेश म्हणजे योगेश कदमचा आदेश लक्षात ठेव. हे उपरे सुपरे आलेत ना त्यांचा आदेश मला नाही चालत. त्यांची एक जरी ड्युटी कॅन्सल केलीस तर मी गाड्या फोडून टाकीन आणि तिथं आलो ना तर स्टाफसोबत तुला जाळून टाकीन,” अशा स्वरूपाची भाषा या ऑडिओ क्लिपमध्ये वापरण्यात आली आहे.

रेळकर यांचं स्पष्टीकरण काय?

एका कर्मचाऱ्याला धमकी देतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’ने पप्पू रेळेकर यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला. याबाबत रेळेकर यांनी म्हटलं की, “आम्ही आमची बाजू रविवारी संध्याकाळी किंवा सोमवारी सकाळी पत्रकार परिषद घेऊन मांडणार आहोत.”

दरम्यान, ही व्हायरल ऑडिओ क्लिप रविवारी सकाळपासून रत्नागिरी जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे. आता या सगळ्याबाबत ज्यांचं नाव घेऊन शहरप्रमुखाने धमकी दिले ते शिवसेनेचे युवा नेते आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम हे काय भूमिका घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत