Scheduled Tribe Person may get Benefits and Concessions after religious conversion Government sets up committee; अनुसूचित जमातीमधील व्यक्तींनी धर्मांतरानंतरही सोयी-सवलती? राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीची स्थापना
Scheduled Tribe Person may get Benefits and Concessions after religious conversion Government sets up committee; अनुसूचित जमातीमधील व्यक्तींनी धर्मांतरानंतरही सोयी-सवलती? राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीची स्थापना
Mumbai News : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात नंदुरबार जिल्ह्याच्या नवापूर तालुक्यातील आदिवासी व बिगर आदिवासींचे ख्रिस्ती धर्मगुरू, मिशनरी व त्यांच्या संस्थांनी प्रलोभने दाखवून धर्मांतर करण्यास भाग पाडल्याबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित करण्यात आली
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : अनुसूचित जमातीमधील व्यक्तींनी धर्मांतर केल्यानंतर मिळणाऱ्या सोयी-सवलतींबाबत केंद्र व राज्य सरकारच्या कायद्यांचा अभ्यास करून राज्यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करण्यासाठी राज्य सरकारने उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. आदिवासी विकासमंत्री अशोक वुईके या समितीचे अध्यक्ष असणार आहेत; तर आदिवासी विकास राज्यमंत्री इंद्रनील नाईक या समितीचे उपाध्यक्ष असतील. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, धर्मरावबाबा आत्राम या समितीचे सदस्य असणार आहेत. त्यांच्यासोबत विधानसभेतील २६ आमदार या समितीचे सदस्य असणार आहेत.
प्रलोभने दाखवून धर्मांतराबाबत लक्षवेधी
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात नंदुरबार जिल्ह्याच्या नवापूर तालुक्यातील आदिवासी व बिगर आदिवासींचे ख्रिस्ती धर्मगुरू, मिशनरी व त्यांच्या संस्थांनी प्रलोभने दाखवून धर्मांतर करण्यास भाग पाडल्याबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित करण्यात आली होती. धर्मांतर केल्यानंतर आदिवासी किंवा अनुसूचित जातीच्या मिळणाऱ्या सवलती रद्द व्हाव्यात अशी मागणी त्या वेळी करण्यात आली होती. त्यावर, धोरण ठरविण्यासाठी विधानसभा सदस्यांची समिती स्थापन करण्यात येईल असे सरकारने म्हटले होते. त्या आश्वासनानुसार ही समिती तयार करण्यात आली आहे. आदिवासी विकास विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसृत केला आहे. आमश्या पाडवी, राजेश पाडवी, डॉ. विजयकुमार गावित आदी एकूण २६ विधानसभा सदस्यांचा या समितीत समावेश असणार आहे. Crime News : 8 वर्षांच्या रिलेशननंतर प्रेमभंग, मुंबईत तरुणीने जीवन संपवलं, कुटुंबीयांनी बॉडी प्रियकराच्या घरी नेली, मंगळसूत्र घालून अंत्यविधी करण्याची मागणी
कुंभमेळ्यासाठी निधी
पुढील वर्षी होणाऱ्या नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कुंभमेळा प्राधिकरणाला १२०० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास सरकारने मान्यता दिली आहे.
नगरविकास विभागाने शुक्रवारी या संदर्भातील सरकारी निर्णय प्रसृत केला आहे. हा निधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आवश्यक कामांसाठी वापरला जाणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या. या पुरवणी मागणीमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आवश्यक कामासाठी तीन हजार कोटी रुपयांची मागणी मंजूर झाली आहे. या मंजूर तरतुदीतील १२०० कोटी रुपये वितरित करण्यास वित्त विभागाने शुक्रवारी मान्यता दिली आहे. राज्य सरकारने यापूर्वी या सिंहस्थासाठी ऑक्टोबर २०२५मध्ये २८३ कोटी, डिसेंबर २०२५ मध्ये ७१७ कोटी, फेब्रुवारी २०२६मध्ये ५०१ कोटी; तर मे २०२६मध्ये ३९६ कोटी रुपयांचा निधी प्राधिकरणाला दिला आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कामांना वेग आला आहे. Atul Pawar : अतुल साप चावल्याने गेला! स्कूल संचालकाच्या बायकोचे स्कूल बसचालकाशी संबंध, पतीचा काटा काढला, पण पवार कुटुंबाने छडा लावलाच
तीनशे कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट
‘राज्य सरकारने २०४७ पर्यंत तीनशे कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरविले असून यावर्षी सुरुवातीच्या टप्प्यात १८ कोटी वृक्षलागवड करण्याचे नियोजन आहे; वृक्षलागवड ही जनचळवळ करण्याकरिता शाळा, महाविद्यालये स्वयंसेवी संस्था, औद्योगिक कंपन्या आदींनी या मोहिमेत सहभागी होऊन योगदान द्यावे,’ असे आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले. कन्हेरी येथील पर्यटन उद्यानाचे ‘स्वर्गीय मा. अजितदादा पवार पर्यटन उद्यान, बारामती’ आणि ‘देवगिरी ते देवराई’ नामफलकाचे अनावरण करून राज्यव्यापी वृक्षसंवर्धन मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. कन्हेरी इथील राखीव वनातील ५५ हेक्टर क्षेत्रासाठी आठ कोटी ७५ लाख रुपये निधी प्राप्त झाला आहे.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा