Richest Country in the World 2026: तुम्हाला कोणी सांगितलं की जगात असाही एक देश आहे जिथे सर्वसामान्य नागरिकसुद्धा करोडपतींसारखे जगतात, तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. पण, हो खरंच असं आहे. जगातील काही निवडक देशांमधील सर्वच लोक श्रीमंत आहेत. पण, जगातील सर्वात श्रीमंत देश कोणता?

गरिबीतून समृद्धीकडील प्रवास
1965 मध्ये जेव्हा सिंगापूरला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा त्या वेळी देशाची आर्थिक परिस्थिती बिकट होती आणि मोठी लोकसंख्या निरक्षर होती. शेतीसाठी पुरेशी जमीन नव्हती आणि खनिजे किंवा तेल यांसारखी नैसर्गिक संसाधनेही नव्हती. तरीही सरकारने शिक्षण, उद्योग, व्यापार आणि परकीय गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करून हळूहळू सिंगापूर आशियातील प्रमुख व्यापारी आणि आर्थिक केंद्र बनले.
सिंगापूर जगातील सर्वात श्रीमंत देश कसा बनला?
व्यवसाय-अनुकूल धोरणे सिंगापूरची सर्वात महत्त्वाची ताकद आहे. इथे कंपनी सुरू करणे तुलनेने सोपे मानले जाते आणि गुंतवणूकदारांना अनेक प्रोत्साहने दिली जातात. याशिवाय भांडवली नफा आणि लाभांशावरील कमी करप्रणाली जागतिक गुंतवणूकदारांना आकर्षित करते, ज्यामुळे मोठ्या संख्येने करोडपती आणि अब्जाधीश येथे स्थायिक पसंत करतात.
श्रीमंत लोकांची पसंती सिंगापूरला
सिंगापूरमध्ये राहणाऱ्या सर्वात प्रमुख अब्जाधीशांपैकी फेसबुकचे सह-संस्थापक एडुआर्डो सॅव्हरिन आहेत, जे अमेरिकेतून सिंगापूरला स्थलांतरित झाले आणि कायमचे स्थायिक झाले. इतकेच नाही, अनेक आंतरराष्ट्रीय व्यावसायिक आणि गुंतवणूकदार सिंगापूरला सुरक्षित आणि स्थिर आर्थिक केंद्र मानतात.
शिक्षा अन् शिस्तीने चित्र पालटले
सिंगापूरचे यश केवळ पैशांपुरते मर्यादित नाही. येथे प्रौढ साक्षरतेचा दर जवळपास 98% वर पोहोचला असून सुधारित शिक्षण, स्वच्छ शहरे, मजबूत कायदा व सुव्यवस्था आणि आधुनिक वाहतूक व्यवस्थेमुळे राहणीमानाचा दर्जा लक्षणीयरीत्या उंचावला आहे.
सिंगापूरच्या लोकांना काय फायदे मिळाले
सिंगापूरच्या आर्थिक प्रगतीचा परिणाम केवळ परकीय गुंतवणूकदारांनाच झाला नाही तर, तेथील सर्वसामान्य नागरिकांनाही झाला. येथे उत्कृष्ट आरोग्यसेवा, उत्तम सार्वजनिक वाहतूक, सुरक्षित वातावरण आणि रोजगाराच्या उच्च संधी उपलब्ध आहेत. त्यामुळेच सिंगापूरला केवळ श्रीमंतांचा देशच नव्हे, तर उच्च जीवनमान असलेला देश बनला.
सिंगापूरमधील पर्यटनाची आकर्षणे
सिंगापूरची अर्थव्यवस्था मजबूत असून उच्च उत्पन्न, आधुनिक पायाभूत सुविधा आणि जागतिक व्यावसायिक केंद्र बनले आहे. येथे भेट देण्यासाठी अनेक सुंदर ठिकाणे आहेत. यापैकी मरीना बे सँड्स सुंदर क्षितिजरेषेसाठी प्रसिद्ध आहे तर, सेंटोसा आयलँडवर तुम्हाला समुद्रकिनारे, साहसी उद्याने आणि मत्स्यालये आढळतील. तसेच गार्डन्स बाय द बे येथील सुपरट्री ग्रोव्ह प्रमुख आकर्षण असून चायनाटाऊन, लिटिल इंडिया आणि मर्लियन पार्क ही ठिकाणेही भेट देण्यासारखी आहेत.

