Headlines

RG Chandramogan Hatsun Agro Products Success Story and Net Worth; गणितात नापास, 65 रुपये महिना पगारावर नोकरी; शेती विकून पुढे उभारला 20000 कोटींचा डेअरी व्यवसाय

Success Story of Indian Dairy Brand: एका मोठ्या डेअरी कंपनीचे मोठं साम्राज्य उभारण्याएवढं आर. जी. चंद्रमोगन यांच्याकडे ना कोणतं मोठं पदवी शिक्षण होतं, ना भांडवल किंवा कोणता मोठा वारसा. होती ती फक्त जिद्द आणि चिकाटी. शाळेत गणितात नापास झालेले चंद्रमोगान आज 13000 कोटींच्या संपत्तीचे मालक बनले आहेत.

RG Chandramogan Hatsun Agro Products Success Story and Net Worth
हॅट्सन ॲग्रोचे संस्थापक आर. जी. चंद्रमोगन यांची यशोगाथा
RG Chandramogan Story: आर. जी. चंद्रमोगन यांच्याकडे महाविद्यालयातील कोणतीही मोठी पदवी किंवा वारसाहक्काने मिळालेली मोठी संपत्ती नव्हती. होती ती फक्त छोटी-छोटी सुरुवात करून यश मिळवण्याची जिद्द. महिन्याला 65 रुपये पगारावर काम करण्यापासून आणि नंतर आईस्क्रीम विकासापासून तामिळनाडूतील या उद्योजकाने ‘हॅटसन ॲग्रो प्रॉडक्ट्स’ला भारतातील सर्वात मोठ्या खाजगी क्षेत्रातील दुग्ध-व्यवसाय कंपनीच्या रूपात उभे केले, जे आता जवळपास 20000 कोटींचे साम्राज्य बनले आहे.

आर.जी. चंद्रमोगन कोण?

आर.जी. चंद्रमोगन कोण?

तामिळनाडू येथील एका छोट्याशा गावातील सर्वसामान्य कुटुंबात चंद्रमोगन यांचा जन्म झाला. त्या केलात स्थानिक व्यावसायिकाच्या यशावरूनच यशाची व्याख्या केली जायची. या गोष्टीने चंद्रमोगन यांच्या सुरुवातीच्या काळातील महत्त्वाकांक्षेला आकार दिला. चंद्रमोगन लहान असताना त्यांचे वडील चेन्नईला स्थायिक झाले आणि 1956 मध्ये सेंट्रल स्टेशनजवळ किराणा मालाचे दुकान सुरू केले. पण 1968 पर्यंत व्यवसाय बुडाला आणि कुटुंबाला रिकाम्या हाती आपल्या मूळ गावी परतावे लागले. चंद्रमोगन यांच्यासाठी व्यवसायातील कठोर वास्तवाचा पहिलाच अनुभव होता.

चंद्रमोगन यांनी उभारला हजारो कोटींचा व्यवसाय

चंद्रमोगन यांनी उभारला हजारो कोटींचा व्यवसाय

व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणतं मोठं भांडवल लागत नाही, तर योग्य क्षेत्रांमध्ये गुंतवणूक आणि परिश्रम घेऊन काम करून व्यवसाय भरभराटीला येतो. आर. जी. चंद्रमोगन यांनी आपल्या जिद्द आणि चिकाटीने हे सिद्ध करून दाखवलं आहे. त्यांनी केवळ 13000 रुपयांमध्ये आपला व्यवसाय सुरू केला आणि आज 20000 कोटींचे डेअरी साम्राज्य उभारले.

कॉलेज सोडून 65 रुपये मजुरी करू लागले

कॉलेज सोडून 65 रुपये मजुरी करू लागले

चंद्रमोगन यांच्यासाठी महाविद्यालयीन पदवी कधीच यशाची पूर्वअट नव्हती. गणितात नापास झाल्यावर महाविद्यालयातून ड्रॉप-आउट झाले, महिन्याला 65 रुपये मजुरीवर काम केले आणि नंतर चेन्नईतील छोट्या दुकानातून आईस्क्रीम विकायला सुरुवात केली. पाच दशकांहून अधिक काळानंतर चंद्रमोगन हॅट्सन ॲग्रो प्रॉडक्ट्स या सूचीबद्ध डेअरी कंपनीचे प्रमुख आहेत, जिचे मूल्य अंदाजे 20000 कोटी रुपये आहे.

स्वतःचा व्यवसाय करण्याची प्रेरणा कशी मिळाली?

स्वतःचा व्यवसाय करण्याची प्रेरणा कशी मिळाली?

वडिलांना व्यवसाय नुकसान झाल्याचा त्यांच्या शिक्षणावरही परिणाम झाला. चंद्रमोगन पालयमकोट्टाई येथील सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये प्री-युनिव्हर्सिटी कोर्स करू लागले, पण गणितात नापास झाले आणि आपले महाविद्यालयीन शिक्षण अर्ध्यावरच सोडले. त्यानंतर वडिलांनी चेन्नईपासून सुमारे 160 किलोमीटर अंतरावरविल्लुपुरम येथील लाकडाच्या गोदामात 65 रुपये महिना पगारावर नोकरी मिळवून दिली. यथे त्यांनी एक वर्ष ऑर्डर्स घ्यायचे आणि शारीरिक कष्टाचे काम केले, ज्यामुळे त्यांना स्वतःचा व्यवसाय करण्याचा आत्मविश्वास मिळाला.

13,000 रुपयांनी सगळं बदललं

13,000 रुपयांनी सगळं बदललं

केवळ व्यावसाय करण्याचा दृढनिश्चय करून चंद्रमोगन गुंतवणूकदार, सल्लागार किंवा औपचारिक व्यवसाय योजनेशिवाय चेन्नईला परतले. आपल्या मुलाच्या स्वप्नावर भरवसा करून वडिलांनी वडिलोपार्जित जमीन 13000 रुपयांना विकली आणि 1970 मध्ये चंद्रमोगन यांनी चेन्नईच्या रोयापुरममध्ये 250 चौरस फुटांची छोटी जागा भाड्याने घेऊन एक साधे बर्फ बनवण्याचे यंत्र आणि 4 कर्मचारी कामावर ठेवले. हे युनिट ‘अरुण’ ब्रँडखाली दररोज 10000 आईस्क्रीम तयार करू लागले.

आईस्क्रीमचा व्यवसाय बंद पडला

आईस्क्रीमचा व्यवसाय बंद पडला

सुरुवातीच्या काळात चंद्रमोगन स्वतःच आपले उत्पादन विकायचे आणि ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी अनेकदा चेन्नईच्या रस्त्यांवरून हातगाडी ढकलत न्यायचे. जवळपास 10 वर्षे आईस्क्रीम विकल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की हंगामी फ्रीझ केलेल्या पदार्थांपेक्षा दुधामध्ये मोठी संधी आहे. भारतात मोठी दुग्ध बाजारपेठ आहे, पण बहुतेक ठिकाणी कोणताही संघटित व्यवसाय नव्हता.

आईस्क्रीममधून दुग्ध व्यवसायात एन्ट्री

आईस्क्रीममधून दुग्ध व्यवसायात एन्ट्री

मग, 1980 च्या दशकात त्यांनी दूध प्रोसेसिंग क्षेत्रात विस्तार केला. हळूहळू कंपनीने लोणी, तूप आणि दही अशी उत्पादनेही बनवली, ज्यामुळे अरुण एका आईस्क्रीम ब्रँडमधून एका व्यापक दुग्ध व्यवसायात रूपांतरित झाला. पण या जलद वाढीचा पाठपुरावा कारण्याऐवजी चंद्रमोगन यांनी वितरण व्यवस्था मजबूत करणे, शेतकरी आणि किरकोळ विक्रेत्यांशी संबंध निर्माण केले आणि पुरवठा वाढवण्याकडे लक्ष दिले.

आज बनवला 20 हजार कोटींचा डेअरी व्यवसाय

आज बनवला 20 हजार कोटींचा डेअरी व्यवसाय

आपल्या दीर्घकालीन दृष्टिकोनामुळे हॅट्सन ॲग्रोभारतातील सर्वात मोठी खासगी दूध कंपनी बनली. देशांतर्गत बाजारात सूचिबद्ध या कंपनीचे बाजार भांडवल जुलै 2020 पर्यंत 20,000 कोटींपर्यंत वाढले. आर.जी. चंद्रमोगन यांची एकूण नेटवर्थ $1.6 अब्ज म्हणजे अंदाजे 13000 कोटी रुपये असल्याचा फोर्ब्सने सांगितले. 2023 मध्ये भारतातील धनवान व्यक्तींच्या यादीत चंद्रमोगन 99 व्या क्रमांकावर होते, तर 2026 मध्ये जागतिक अब्जाधीशांच्या यादीत त्यांचा 2,481 वा नंबर लागतो.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा