Pune Lohagad Trek Ketan Agarwal Death Fiance Siya Goyal Chetan Chaudhary Love Story on Cricket Field Crime News; काय क्रिकेट खेळतो! दादाच्या मॅच पाहताना मित्र मनात भरला, सिया-चेतनची पहिली ओळख, कॉमन फ्रेण्डमुळे नातं बहरलं
Pune Lohagad Trek Ketan Agarwal Death Fiance Siya Goyal Chetan Chaudhary Love Story on Cricket Field Crime News; काय क्रिकेट खेळतो! दादाच्या मॅच पाहताना मित्र मनात भरला, सिया-चेतनची पहिली ओळख, कॉमन फ्रेण्डमुळे नातं बहरलं
Pune Ketan Agarwal Death Case : चेतन हा उत्तम क्रिकेटपटू असून त्याने साहिलसोबत काही सामने खेळले होते. दादाचे सामने पाहण्यासाठी सिया अनेकदा त्याच्यासोबत जात असल्याने दोघांची ओळख झाली
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासाला रोज नवनवीन वळण लागताना दिसत आहे. मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची पोलीस चौकशी सुरु आहे. चेतन हा सियाचा मोठा भाऊ साहिल गोयल याचा जवळचा मित्र आहे. क्रिकेटच्या माध्यमातून चेतन-सियाची पहिल्यांदा ओळख झाली होती. याच ओळखीचे रुपांतर पुढे सिया आणि चेतन यांची मैत्री जुळण्यात झाले.
पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चेतन हा स्वतः उत्तम क्रिकेटपटू असून त्याने साहिलसोबत काही सामने खेळले होते. दादाचे सामने पाहण्यासाठी सिया अनेकदा त्याच्यासोबत जात असे. याच काळात सिया आणि चेतन यांची पहिली ओळख झाली असावी आणि त्यानंतर त्यांच्यात संपर्क वाढला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे.
दोघांच्या ‘कॉल डिटेल रेकॉर्ड्स’वरून असे दिसून येते की, सिया-चेतन अनेक महिने नियमित संपर्कात होते. पोलीस आकडेवारीनुसार, जानेवारीपासून सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्यात एकूण २००४ वेळा फोनवर संभाषण झाले. या संभाषणांचा एकूण कालावधी जवळपास २३८ तास इतका होता, ज्यावरून या दोन आरोपींमध्ये सातत्याने संवाद सुरु असल्याचे स्पष्ट होते.
94 वर्षांच्या आजींनी सोडलं अमेरिकेचं नागरिकत्व; भारतीय बनण्यासाठी मोठा निर्णय!
दरम्यान, दोन्ही आरोपींनी त्यांच्या मोबाईलवरील चॅट आणि ऑनलाइन हिस्ट्री डिलिट केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर, या प्रकरणाचा तपास आता डिजिटल पुराव्यांच्या दिशेने विस्तारला आहे. दोन्ही फोन्सवरील व्हॉट्सॲप चॅट्स, इन्स्टाग्रामवरील संवाद आणि इतर डिलीट केलेले डिजिटल रेकॉर्ड्स यांचे फॉरेन्सिक विश्लेषण केले जात आहे. लोहगड येथील घटनेपूर्वी आणि नंतरही दोघांनी चॅट्स हटवले असावेत, असा पोलिसांना संशय आहे.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा