Headlines

Pune Dapodi Phugewadi Poisonous Liquor Case Two Brothers Same Family Die Family Awaits Government Help; कष्टाने संसार उभा केला, विषारी दारुमुळे कुटुंब उद्ध्वस्त, दोन घासांसाठी वणवण, धुणेभांडी करण्याची वेळ; पुण्यातील राठोड कुटुंबाचं हृदयद्रावक वास्तव


Pune Phugewadi Poisonous Liquor Case Sarika Rathod Story : ‘आम्हाला दान नको, काम हवे. मुलांना शिकवून त्यांच्या पायावर उभे करायचे आहे. महापालिकेकडून तात्पुरती रोजगाराची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, किमान घर चालविता येईल, मुलांचे शिक्षण आणइ आरोग्याकडे लक्ष देता येईल, असे काम मिळायला हवे. माझा नवरा, दीर आता परत येणार नाही, दारुच्या मार्गावर कोणीही जाऊ नये’, असं मृत विजय राठोड यांची पत्नी सारिका राठोड यांनी म्हटलं आहे.

Pune Phugewadi Poisonous Liquor Case Sarika Rathod Story
दापोडी विषारी दारुप्रकरण राठोड कुटुंब(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, पुणे : फुगेवाडी येथील विषारी दारू दुर्घटनेत दोन कर्ते पुरुष गमावलेल्या राठोड कुटुंबावर आज रोजच्या दोन घासांसाठी झगडण्याची वेळ आली आहे. मोठी सून दोन मुलांसह माहेरी गेली. अंथरुणाला खिळलेले सासरे, मानसिक धक्क्यातून न सावरलेली सासू आणि स्वतःच्या दोन मुलांची जबाबदारी धाकटी सून सारिका राठोड यांच्यावर पडली आहे. दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत असताना त्या धुणीभांडी आणि मिळेल ते रोजंदारीचे काम करून संसाराचा गाडा ओढत आहेत.

राठोड कुटुंबाने कष्टाने संसार उभा केला

रोजगाराच्या शोधात पिंपरी-चिंचवडमध्ये आलेल्या राठोड कुटुंबाने कष्टाने संसार उभा केला होता. मात्र, विषारी दारूमुळे राजू आणि विजय या सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आणि सारे कुटुंब उद्ध्वस्त झाले. या आघातानंतर कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटली. सारिका राठोड सकाळपासून घराघरांत धुणीभांडी करतात. मोठा मुलगा राजूच्या निधनानंतर त्यांची पत्नी संगीता मुलांना घेऊन माहेरी गेल्या. त्यांचे सासरेही विषारी दारु प्यायल्यामुळे अंथरुणाला खिळले आहेत, तर सासू मानसिक धक्क्यातून सावलेल्या नाहीत. सारिका राठोड मिळेल ते काम करतात. ११ वर्षांचा श्रेयस आणि सात वर्षांची चैत्राली यांच्या भवितव्याची चिंता त्यांना सतावत आहे. मुलांचे शिक्षण थांबू नये, एवढीच त्यांची अपेक्षा आहे.
Maharashtra TimesEknath Shinde : दगदग-धावपळीने अशक्तपणा, एकनाथ शिंदे रुग्णालयात, कशी आहे प्रकृती? Health Update समोर
तुटपुंज्या उत्पन्नातून घरभाडे, किराणा, औषधे आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागविण्याचा प्रयत्न करतात. अकरा वर्षांचा श्रेयस आणि सात वर्षांची चैत्राली यांच्या भवितव्याची चिंता त्यांना सतावत आहे. मुलांचे शिक्षण थांबू नये, एवढीच त्यांची अपेक्षा आहे. विषारी दारू दुर्घटनेतील बळींच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मात्र, अनेक कुटुंबांना ती अद्याप मिळालेली नाही. तातडीने आर्थिक मदत, कुटुंबातील एका सदस्याला कायम नोकरी आणि मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सरकारने स्वीकारावी, अशा मागण्या पीडित कुटुंबांनी केल्या आहेत.

सरकारी मदतीची प्रतीक्षा कायम

विषारी दारू दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. मात्र, अनेक कुटुंबांना ही मदत अद्याप प्रत्यक्ष मिळालेली नाही. कागदपत्रांची पूर्तता, बँकेच्या फेऱ्या आणि प्रशासकीय प्रक्रियेमुळे मदत रखडल्याची तक्रार कुटुंबीयांकडून केली जात आहे. दरम्यान, पीडित कुटुंबांनी तातडीने आर्थिक मदत, कुटुंबातील एका सदस्याला कायमस्वरुपी रोजगार आणि मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सरकारने स्वीकारावी, अशी मागणी केली आहे.
Maharashtra TimesPune Crime : कंपनीत शिफ्ट सुरु असताना संतापजनक कृत्य, सहकाऱ्याने प्रायव्हेट पार्टमध्ये कॉम्प्रेसरचा पाइप घातल्याने पोटात हवा; पुण्यात कामगाराचा मृत्यू

एकाच खोलीत संसार…

सारिका या दोन मुले आणि सासू, सासऱ्यांसह एका खोलीत राहतात. सासरे अंथरुणाला खिळल्याने खाटेवर पडून असतात. तिथेच स्वयंपाक करायचा, तिथेच सर्वांनी झोपायचे. शौचालयाचीही सुविधा नसल्याने पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. ही केवळ राठोड कुटुंबीयांची परिस्थिती नाही, तर परिसरातील सर्वच पीडितांची कथा आहे.
Maharashtra TimesPune News: प्रेमविवाह करून बारामतीतून पुण्यात शिफ्ट झाले, पण पती ऑफिसमधील मुलीच्या प्रेमात पडला; तरुणीने जीवन संपवलं!
‘फुगेवाडीतील एकूण १७ पीडित कुटुंबीयांपैकी आठ कुटुंबीयांना सरकारतर्फे आर्थिक मदत देण्यात आलेली आहे. उर्वरित कुटुबीयांना आर्थिक मदत देण्याची प्रक्रिया चालू आहे’, असं अपर तहसीलदार जयराज देशमुख यांनी म्हटलं आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा