Headlines

Nobody Honks Here Indian Man Compares US and India Traffic Video Goes Viral | ना हॉर्न ना घाई! अमेरिकेतलं ट्रॅफिक जॅम कसं दिसतं? लोकांचा संयम पाहून भारतीय तरुण झाला थक्क, पाहा व्हायरल व्हिडीओ


Traffic Discipline: एका भारतीय तरुणाने अमेरिकेतील ट्रॅफिक जॅमचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, लोक वाहतूक कोंडीत अडकले आहेत, पण कोणीही हॉर्न वाजवत नाही. उलट, लोक शांतपणे एकाच जागी उभे आहेत.

US Traffic Jam
(फोटो सौजन्य – harsh05kumar/Instagram)
ट्रॅफिक जॅम ही समस्या खरं तर जगभरात आहे. अगदी युरोप-अमेरिकेसारख्या प्रगत देशांमध्येही लोक काही वेळा तासनतास वाहतूक कोंडीत अडकल्याचं तुम्ही सोशल मीडियावर पाहिलं असेल. पण भारतीय ट्रॅफिकमध्ये आणि अमेरिकेतील ट्रॅफिकमध्ये खूप मोठा फरक असल्याचा अनुभव एका भारतीय तरुणाने सांगितला आहे. तो म्हणतो, भारतीयांकडे थोडाही संयम नसतो. लोक अगदी फुटपाथवरून गाड्या चालवायलाही मागे-पुढे पाहत नाहीत. आणि ज्यांना गाडी पुढे नेण्याची संधी मिळत नाही, ते हॉर्न वाजवून आपला राग व्यक्त करतात. पण याउलट अमेरिकेतील लोक शांतपणे आपल्या गाडीत बसून राहतात. उगाच हॉर्न वाजवून ध्वनीप्रदूषण करत नाहीत.

हा व्हिडिओ होतोय व्हायरल

​ ​

हा व्हिडिओ harsh05kumar या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. अमेरिकेत राहणाऱ्या हर्ष कुमार या तरुणाने या व्हिडिओच्या माध्यमातून अमेरिकेतील ट्रॅफिकचा अनुभव शेअर केला आहे. तो सांगतो, अपघातामुळे रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे. लोकांची वाहनं बराच वेळ एकाच जागी उभी आहेत. पण लक्षवेधी बाब म्हणजे, कोणीही हॉर्न वाजवत नाही. उलट चालक शांतपणे वाहनांमध्ये योग्य अंतर ठेवून उभे आहेत. या परिस्थितीची तुलना त्याने भारतातील ट्रॅफिक जॅमशी केली आहे. त्याच्या मते, भारतात वाहतूक कोंडी होताच अनेकजण हॉर्न वाजवतात आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करतात.

हा व्हिडिओ सुद्धा पाहा

​ ​

हा व्हिडिओ १४ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तसेच, लोकांनी या व्हिडिओवर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत भारतात ‘सिव्हिक सेन्स’ कमी असल्याचं म्हटलं आहे. असो, ट्रॅफिक जॅममध्ये तुम्हीही कधी ना कधी अडकला असाल. तुमचे काही वेगळे अनुभव असतील, तर आमच्यासोबत नक्की शेअर करा.

(महत्वाची टीप – या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)

मंदार गुरव

लेखकाबद्दलमंदार गुरवमंदार गुरव हे गेल्या १० वर्षांपासून डिजिटल पत्रकारीता या क्षेत्रात काम करत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्समध्ये गेल्या ५ वर्षांपासून व्हायरल सेक्शनमध्ये कार्यरत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ, मीम्स आणि चर्चेत असलेल्या घडामोडी वेळेवर आणि जबाबदारीनं वाचकांपर्यंत पोहोचवणं, हे त्यांचं मुख्य काम आहे. सोबतच खेळ आणि गुन्हेगारी विश्वातील व्हायरल गोष्टींवरही ते सातत्यानं काम करतात. डिजिटल माध्यमं ही अत्यंत वेगानं माहिती देण्यासाठी ओळखली जातात. पण या वेगातही माहिती खरी आहे का? याची खात्री करून घेत आणि पत्रकारितेचा विश्वास जपत, मंदार आपलं काम चोख बजावत आहेत.

डिजिटल पत्रकारितेच्या या प्रवासात मंदार गुरव यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक लेख लिहिले आहेत. वाचकांना जलद, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती मिळावी, यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. व्हायरल न्यूज, क्रीडा बातम्या, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी तसंच संशोधनावर आधारित विशेष लेख लिहिताना विषय साध्या आणि अत्यंत सोप्या भाषेत मांडणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे.

महाराष्ट्र टाईम्स पूर्वी मंदार गुरव यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ५ वर्षे मनोरंजन आणि स्पोर्ट्स विभागासाठी लेखन केलं आहे. याच काळात लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये हॉलिवूडच्या टेकडीवरून हा कॉलम सुद्धा त्यांनी ३ वर्षे सातत्याने लिहिला. या कॉलममधून हॉलिवूडमधील घडामोडी, आंतरराष्ट्रीय मनोरंजन बातम्या, चित्रपटांचे रिव्ह्यू तसेच सायन्स फिक्शन चित्रपटांमधील रंजक आणि मजेशीर माहिती त्यांनी वाचकांसमोर मांडली. तसंच लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांच्या मुलाखतींमध्ये सहभागी होत, मनोरंजन क्षेत्राचा अनुभव अधिक वाढवला.

क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातही मंदार यांचा अनुभव खुप चांगला आहे. त्यांनी क्रिकेट वर्ल्ड कप, IPL आणि २०२० टोकियो ऑलिम्पिक यांसारख्या लोकप्रिय स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. खेळाडूंची कामगिरी, संघांची तयारी आणि स्पर्धांमागील महत्त्वाच्या घडामोडी वाचकांना सोप्या भाषेत समजावून सांगणे, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.

राजकीय घडामोडींच्या कव्हरेजमध्येही मंदार गुरव यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१७, लोकसभा निवडणूक २०१९ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ यांचे सविस्तर वृत्तांकन केले आहे. निवडणुकांशी संबंधित बातम्या, महत्त्वाचे मुद्दे आणि निकाल समतोल आणि तथ्यांच्या आधारावर मांडण्याचा अनुभव त्यांना आहे.

शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदार गुरव यांनी साठ्ये कॉलेज, मुंबई विद्यापीठ येथून बॅचलर इन मास मीडिया ही पदवी घेतली आहे. शिक्षणातून मिळालेलं ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव एकत्र वापरून, वाचकांना उपयुक्त आणि दर्जेदार माहिती देणं, हा मंदार गुरव यांचा मुख्य हेतू आहे.आणखी वाचा