Neha Dhupia On Karan Johar : अभिनेत्री नेहा धुपियाने तिच्या नो फिल्टर विथ नेहा या शोमध्ये करण जोहरला लग्नाची मागणी घातल्याची कबुली दिली होती.

नेहाचा सुरुवातीचा प्रवास
नेहा धुपियाचा जन्म 27 ऑगस्ट 1980 रोजी केरळमधील कोची येथे झाला होता. तिचे वडील भारतीय नौदलात अधिकारी असल्याने तिचे बालपण विविध ठिकाणी गेले; तिचे बहुतांस बालपण हे दिल्लीत गेले. तिने दिल्लीतील ‘जीझस अँड मेरी कॉलेज’मधून इतिहासात आपले शिक्षण पूर्ण केले. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी तिने मॉडेलिंग आणि रंगभूमीवर काम केले, तसेच जाहिराती आणि म्युझिक व्हिडिओंतही ती झळकली होती.
‘मिस इंडिया’ ते फिल्म इंडस्ट्रीचा प्रवास
2002 मध्ये ‘फेमिना मिस इंडिया’चा किताब जिंकल्यानंतर नेहा जास्त प्रकाशझोतात आली होती. त्यानंतर तिने ‘मिस युनिव्हर्स 2002’ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आणि अंतिम 10 स्पर्धकांमध्ये स्थान मिळवले. तिच्या कारकिर्दीतील हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरला होता, यामुळेच भारतीय फिल्म इंडस्ट्रीची दारे तिच्यासाठी खुली झाली.
हिंदी फिल्म इंडस्ट्री व्यतिरिक्त नेहाने इतर भाषांमधील चित्रपटांमध्येही काम केले. 2003 मध्ये ‘कयामत: सिटी अंडर थ्रेट’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 2004 मधील ‘जुली’ या चित्रपटाने तिला भरपूर प्रसिद्धी मिळवून दिली. त्यानंतर तिने ‘क्या कूल हैं हम’ , ‘चुप चुप के’, ‘शूटआउट ॲट लोखंडवाला’ आणि ‘सिंग इज किंग’ यांसारख्या चित्रपटांत वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या. तसेच, तिने ‘हिंदी मीडियम’ , ‘तुम्हारी सुलू’ , ‘लस्ट स्टोरीज’ आणि ‘अ थर्सडे’ यांसारख्या चित्रपटांतही काम केले आहे.
Haryanvi Singer Ankit Baliyan : जिममधून बाहेर पडताच हरियाणाच्या प्रसिद्ध गायकाला जागीच संपवलं ; आई लेकाचं डोकं मांडीवर ठेवून बोलतेय- शूssss तो झोपलाय!
मात्र, नेहाने स्वतःला केवळ चित्रपटांपुरते मर्यादित ठेवले नाही. ती टेलिव्हिजनवरही सक्रिय राहिली आणि ‘रोडीज’ सारख्या लोकप्रिय रिअॅलिटी शो मध्ये ती झळकली. याव्यतिरिक्त, तिने ‘स्टाइल्ड बाय नेहा’ सारख्या कार्यक्रमांचे सूत्रसंचालनही केले. ‘नो फिल्टर नेहा’ या शोद्वारे तिने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली; या शोमध्ये ती चित्रपटसृष्टीतील कलाकारांशी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल, आवडीनिवडींबद्दल आणि अनुभवांबद्दल मनमोकळ्या गप्पा मारायची.
करण जोहरला लग्नासाठी मागणी
याच शोदरम्यान करण जोहरशी संबंधित एक मजेशीर किस्सा समोर आला. एका मुलाखतीत नेहाने सांगितले की, तिने करण जोहरला वेगवेगळ्या ठिकाणी तीनदा गंमतीने लग्नासाठी मागणी घातली होती, पण त्याने प्रत्येक वेळी या प्रपोजलला नकार दिला. तिने नमूद केले की, करणने नकार देण्यासाठी अनेक कारणे दिली होती, ज्यापैकी एका कारणामुळे तिलाही हसू आले.
Kangana Ranaut On Baba Ramdev : ते माझ्या बेडरुममध्ये वटवाघुळासारखे लटकलेले का? कंगना रणौत अन् बाबा रामदेव यांची शाब्दिक चकमक
नेहा म्हणाली, “माझे प्रपोजल नाकारताना करणने दिलेल्या कारणांपैकी एक कारण म्हणजे त्याला माझे शरीर आकर्षक वाटले नाही.”
नेहाने करण जोहरच्या दिग्दर्शनाखाली ‘लस्ट स्टोरीज’ मध्ये काम केले. तसेच, ‘ए दिल है मुश्किल’ या चित्रपटात तिने एका पत्रकाराच्या भूमिकेसाठी आपला आवाज दिला होता. नेहाने नंतर सांगितले की, तिने आपल्या पॉडकास्टसाठी करणला अनेकदा फोन केला होता आणि तिचा आवाज वारंवार ऐकल्यामुळेच त्याने तिला त्या ‘व्हॉइस रोल’साठी आमंत्रित केले होते.
विशेष म्हणजे, नेहाच्या वैयक्तिक आयुष्यातही करण जोहरची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. नेहा आणि अंगद बेदी यांच्या लव्ह स्टोरी दरम्यान त्यांना एकमेकांच्या जवळ आणण्यात त्याने मदत केली होती. शिवाय, ‘नो फिल्टर नेहा’ या शोमध्ये करण पहिला पाहुणा म्हणून सहभागी झाला होता आणि त्यानंतरही तो अनेकदा या शोमध्ये दिसलेला.
अंगद बेदीशी लग्न
नेहा धुपियाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास, नेहाने 10 मे 2018 रोजी अभिनेता अंगद बेदीशी लग्न केले. या जोडप्याने दिल्लीत एका खाजगी समारंभात विवाह केला. लग्नानंतर त्यांना दोन मुले झाली; त्यांची मुलगी ‘मेहर’चा जन्म नोव्हेंबर 2018 मध्ये झाला, तर मुलगा ‘गुरिक’चा जन्म ऑक्टोबर 2021 मध्ये झाला.

