Narendra patil stern warning anger in maratha community due to oppressive government conditions; फडणवीसांच्या जवळच्या नेत्यानेच सरकारविरोधात थोपटले दंड; नरेंद्र पाटलांचा संताप, राजीनाम्याचा इशारा
Narendra patil stern warning anger in maratha community due to oppressive government conditions; फडणवीसांच्या जवळच्या नेत्यानेच सरकारविरोधात थोपटले दंड; नरेंद्र पाटलांचा संताप, राजीनाम्याचा इशारा
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: राज्यात मराठा क्रांती मोर्चे निघाल्यानंतर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला भरीव निधी देऊन सक्षम करण्यात आले. त्यामुळे महामंडळाचे एक लाख ८० हजारांपेक्षा अधिक लाभार्थी झाले आहेत. मात्र, महामंडळाचे विद्यमान व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी जाचक अटी-शर्ती केल्यामुळे लाभार्थ्यांची संख्या घटली आहे. या अधिकाऱ्यामुळे मराठा समाजाचा सरकारविरोधात रोष वाढला आहे. मुख्यमंत्र्यांकडे निवेदन देऊनही त्यांची बदली होणार नसेल तर वेळप्रसंगी पद सोडेन, असे वक्तव्य महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केले.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लाभार्थ्यांची सुभेदारी विश्रामगृह येथे बैठक घेत अडचणी जाणून घेतल्या. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘वाहनांची संख्या जास्त असल्यामुळे वाहन कर्ज मिळणार नाही, असे संचालक म्हणतात. पण, कोणता व्यवसाय करायचा हे लाभार्थी ठरवतात. महामंडळाचे लाभार्थी ग्रामीण भागातील असून ट्रॅक्टर, टेम्पो, ट्रक, जेसीबी या वाहनांसाठी कर्ज घेतात. शिवाय १५ लाख रुपये कर्ज हवे असेल तर सहा लाख रुपये उत्पन्नाचे प्रमाणपत्र सादर करा, अशा अटी घातल्या आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांची संख्या घटून महामंडळ पिछाडीवर पडले आहे. कागदपत्रांच्या अटींमुळे तर लोक त्रस्त आहेत. व्याज परतावा नसेल तर कर्ज मंजूर करणार नसल्याची त्यांची भूमिका लोकांच्या मनात सरकारच्या विरोधात राग निर्माण करीत आहे. हा प्रकार हेतुपुरस्सरपणे सुरू असल्याचा संशय आहे. महामंडळाचा अध्यक्ष असूनही मला विश्वासात न घेता कामकाज सुरू आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनाही माहिती कळवली आहे’, असे पाटील म्हणाले.
दरम्यान, येत्या मंगळवारी मुंबईत मराठा आरक्षण उपसमितीची बैठक आहे. या बैठकीत राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे कागदपत्रे सादर करणार आहे. शिवाय, ‘एनसीईआरटी’ने हटविलेला मराठा साम्राज्याचा नकाशा अभ्यासक्रमात समाविष्ट करावा, अशा विविध प्रलंबित मागण्यांवर चर्चा होईल, अशी माहिती पाटील यांनी दिली.
शहरातील वस्तूसंग्रहालयाची दुरवस्था
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालय डबघाईस आले आहे. १५ वर्षांपूर्वी ग्रंथालय व संशोधन केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन झाले असताना ही जागा इतर संस्थेला देण्याचा झालेला करार चुकीचा आहे. संग्रहालयाच्या डागडुजीसाठी निधी देण्याबाबत पालकमंत्री आणि इतर लोकप्रतिनिधींना सांगणार आहे, असे नरेंद्र पाटील म्हणाले. वस्तूसंग्रहालयाला नीट सुरक्षितता नसल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा