Headlines

Nandurbar 23 year old married woman dies due to lack of medical treatment; विवाहितेला प्रसूती वेदना, पण गावात ना नेटवर्क, ना रस्ता; २३ वर्षीय महिलेचा उपचाराअभावी मृत्यू


महेश पाटील, नंदुरबार: देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक दशके उलटली, विकासाच्या मोठमोठ्या घोषणा झाल्या; मात्र सातपुड्याच्या कुशीतील अतिदुर्गम गावांचा ‘पायाभूत सुविधांचा वनवास’ अद्याप संपलेला नसल्याची संतापजनक वस्तुस्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे. अक्कलकुवा तालुक्यातील वेहगी येथील बारीपाडा गावात रस्ता आणि नदीवर पूल नसल्याने एका २३ वर्षीय विवाहितेला वेळेत वैद्यकीय उपचार मिळू शकले नाहीत. बांबू आणि चादरीची झोळी करून तिला दवाखान्यात नेले जात असताना वाटेतच तिची प्राणज्योत मालवली. या हृदयद्रावक घटनेने प्रशासनाच्या विकासाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

वेहगीच्या बारीपाडा येथील रुसाबाई सुभाष वळवी (वय २३) यांना शुक्रवारी सायंकाळी साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास अचानक छातीत आणि पोटात तीव्र वेदना सुरू झाल्या. काही वेळातच त्यांची प्रकृती गंभीर झाली. मात्र गावाला जोडणारा पक्का रस्ता नाही, तर उपनदी सुक नदीवर पूल नसल्याने रुग्णवाहिका थेट गावापर्यंत पोहोचू शकली नाही.

अखेर नातेवाईक आणि ग्रामस्थांनी बांबू व चादरीच्या साहाय्याने झोळी तयार केली आणि रुसाबाईंना त्यात ठेवून पिंपळखुंटा येथील रुग्णालयाच्या दिशेने पायपीट सुरू केली. मात्र नदी आणि दुर्गम वाटेतील अडथळे पार करण्यात मौल्यवान वेळ निघून गेला. उपचारासाठी रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच रुसाबाईंची प्राणज्योत मालवली. वेळेत वैद्यकीय मदत मिळाली असती तर या तरुण विवाहितेचा जीव वाचू शकला असता, अशी हळहळ ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. रुसाबाई यांचे माहेर वेहगी बारीपाडा येथे असून त्यांचे सासर ओहवा येथे आहे. दोन दिवसांपूर्वीच त्या पतीसोबत माहेरी आल्या होत्या. त्यांना सात महिन्यांचे बाळ असल्याची माहिती असून, त्यांच्या अकाली मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सातपुड्यात आजही अनेक गावे अशी आहेत की, जिथे जाण्यासाठी सर्वकालीन रस्ते नाहीत, नद्यांवर पूल नाहीत, फरशी किंवा साकव नाहीत. पावसाळ्यात ही गावे अक्षरशः बाहेरील जगापासून तुटून पडतात. अत्यवस्थ रुग्ण, गर्भवती माता, विद्यार्थी, शासकीय कर्मचारी आणि ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून नदी-नाले ओलांडावे लागतात. विकासाच्या घोषणा आणि निवडणुकांतील आश्वासनांनंतरही मूलभूत सुविधांसाठी नागरिकांना असा संघर्ष करावा लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे.

“आमच्या जीवाची शासनाला काहीच किंमत नाही का?”

“प्रत्येक निवडणुकीत रस्ता आणि पूल करून देण्याची आश्वासने दिली जातात. मात्र प्रत्यक्षात आजही ग्रामस्थांना नरकयातना सहन कराव्या लागत आहेत. रस्त्यासाठी काही दिवसांपूर्वी आम्ही अक्कलकुवा तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले; मात्र आमच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याऐवजी आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. सुमारे दोन हजारांहून अधिक ग्रामस्थ आजही रस्ता आणि पूल नसल्याचा त्रास सहन करत आहेत. अत्यवस्थ रुग्ण, गर्भवती माता, शालेय विद्यार्थी, गावकरी आणि शासकीय कर्मचाऱ्यांची ही रोजची परीक्षा थांबली पाहिजे. सुविधा मागणे हा आमचा अधिकार नाही का? रस्ता आणि पुलाअभावी आणखी किती जीव जाणार? शासन आणि प्रशासनाने किमान आता तरी या प्रश्नाकडे डोळसपणे पाहावे,” अशी मागणी वेहगी येथील ग्रामस्थ दिलीप जयसिंग पाडवी यांनी केली आहे.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत