Headlines

Nagpur Bribe Case: आरटीओचा दलाल हिंगोली ‘एसीबी’च्या जाळ्यात; कारवाई टाळण्यासाठी लाच घेताना रंगेहाथ अटक, प्रकरण काय?


Nagpur Bribe Case: पैसे दिल्यास वाहनांचे क्रमांक यादीत नमूद करून कारवाई टाळण्याचे आश्वासन दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Anderson Phillip Catch - 2026-08-14T111007
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, नागपूर: ट्रकवर कारवाई न करण्यासाठी लाच घेतल्याच्या आरोपाखाली ग्रामीण आरटीओ कार्यालयाशी संबंधित दलालाला हिंगोलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी रंगेहात अटक केली. या कारवाईमुळे आरटीओ वर्तुळात खळबळ उडाली आहे.

आरोपी हा आरटीओतील कोणत्या अधिकाऱ्यासाठी लाच स्वीकारत होता, याचा तपास एसीबीने सुरू केला आहे. संजय पुरुषोत्तम कातुरे (वय ४३, रा. रतन हाइट्स, मेडिकल चौक) असे अटकेतील दलालाचे नाव असून एका वाहतूकदाराच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.

तक्रारदाराकडे दहापेक्षा अधिक ट्रक आणि इतर वाहने आहेत. या वाहनांवर आरटीओकडून कारवाई होऊ नये, यासाठी कातुरे याने वाहतूकदाराशी संपर्क साधला. त्याने १ लाख ६८ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.

Maharashtra TimesNagpur Accident : मित्राच्या बर्थडेला निघाले, स्पीड वाढवला अन् घात झाला, दोघा मित्रांचा करुण शेवट, कार चालकाचे वडील गोत्यातवाहतूकदाराने कातुरेच्या बँक खात्यात ऑनलाइन ५३ हजार रुपये जमा केले. त्यानंतर उर्वरित १ लाख १५ हजार रुपयांसाठी कातुरे तगादा लावत होता. त्यामुळे वाहतूकदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मुख्यालयात तक्रार केली.

अपर पोलिस महासंचालक डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी हिंगोली पथकाला कारवाईचे निर्देश दिले. गुरुवारी पथक नागपुरात दाखल झाले. ग्रामीण आरटीओ कार्यालयासमोरील कातुरेच्या कार्यालय परिसरात सापळा रचण्यात आला. वाहतूकदाराकडून ५० हजार रुपये स्वीकारताच पथकाने कातुरेला अटक केली. याप्रकरणी जरीपटका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास एसीबी करीत आहे.

Maharashtra TimesNagpur Pollution: मुंबई अन् पुण्यापेक्षा नागपूर अधिक प्रदूषित; उन्हाळ्यात 46 दिवस धूलिकण मर्यादेपेक्षा अधिकतडीपार गुंडाला शस्त्रासह अटक
नागपूर : जुनी कामठी पोलिसांनी तडीपार गुंडाला शस्त्रासह अटक केली. मोहम्मद शाहीद एजाज अन्सारी (वय ४२, रा. वारीसपुरा, कामठी), असे अटकेतील गुंडाचे नाव आहे. एप्रिल महिन्यात शाहीद याला शहर व जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले. तडीपार असतानाही तो नागपुरात परतला. जुनी कामठी पोलिसांनी मंगळवारी रात्री सापळा रचून त्याला अटक करीत त्याच्याकडून चाकू जप्त केला.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा