Headlines

Mumbai News: मायानगरीचा मोह! ‘तारक मेहता’ शोमध्ये काम करण्यासाठी मुलाने सोडलं घर, थेट गाठली मुंबई – madhya pradesh 16 yrs old boy came to mumbai film city to work on the show taarak mehta ka ooltah chashmah


Mumbai News: योग्य सल्ल्ला आणि मार्गदर्शनाशिवाय मुलांना एकटे सोडू नये असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

Anderson Phillip Catch - 2026-08-10T144719
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
मुंबई : स्वप्नांचं शहर, भुकेलेल्या प्रत्येकाचे पोटं भरणारं शहर, देशभरात कुठेही चित्रनगरी थाटल्या जात असल्या तरी मुंबईच्या दादासाहेब फाळके चित्रनगरीची ओढ आजही तितकीच आहे. झगमगत्या चित्रपटसृष्टीत नशीब आजमावण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेकांची पावले मुंबईच्या चित्रनगरीकडे आपसूकच वळतात. आसामची तरुणी आणि मध्य प्रदेशचा एका शाळकरी मुलगा अशीच स्वप्ने बाळगून घरच्यांना न सांगताच मुंबईत आली. सुदैवाने दोघेही पोलिसांच्या हाती लागले आणि पोलिसांनी त्यांना सुरक्षित पालकांच्या स्वाधीन केले.

आसामच्या १५ वर्षाच्या रूपल (बदललेले नाव) हिला चित्रपटाबद्दल फार आकर्षण होते. आपणही चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करून मोठी अभिनेत्री व्हावे असे तिचे स्वप्न होते. अभिनेत्री होण्यासाठी तिची काहीही करण्याची तयारी होती. त्यातच मुंबईतील फिल्मसिटीबाबत तिने बरेच ऐकले होते. अनेक बडे अभिनेते आणि अभिनेत्री याच फिल्मसिटीतून तयार झाल्याचे तिने वाचले होते. त्यामुळे तिलाही राहवले नाही आणि रूपल देखील घरच्यांना काहीच कल्पना न देता घरातून बाहेर पडली.

Maharashtra TimesPrabalgad : प्रबळगडावर 17 वर्षीय तरुण-तरुणी वाट चुकले, पावसाळ्यात नवख्या पर्यटकांची तारांबळ, पोलीस-स्थानिकांमुळे डोंगरावरुन सुरक्षित खालीरूपलने मुंबई गाठली आणि मुंबईत आल्यावर थेट आरे फिल्मसिटी येथे पोहोचली. आतमध्ये प्रवेश न देण्यात आल्याने बाहेर घुटमळत असताना आरे पोलिसांची नजर तिच्यावर पडली. पोलिसांनी अल्पवयीन असलेल्या रूपलला ताब्यात घेऊन तिच्याविषयी, कुटुंबीयांविषयी माहिती जाणून घेतली. त्यांच्या मोबाइल क्रमांक मिळताच पोलिसांनी पालकांशी संपर्क केला. रूपल हिला आसाममध्ये शोधत असताना तिच्या पालकांना मुंबई पोलिसांचा फोन गेला आणि त्यांचा जीव भांड्यात पडला.

आरे पोलिसांना उत्तर नियंत्रण कक्षातून एक संदेश आला. फिल्म सिटी येथे एक बेवारस मुलगा फिरत आहे, असे सांगण्यात आले. आरे पोलिसांचे पथक तत्काळ फिल्मसीटीच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचले. पोलिसांनी या मुलाला जवळ घेतले आणि आपुलकीने त्याच्याकडे विचारपूस केली. त्यावेळी पारस नाव सांगणारा हा १६ वर्षांचा मुलगा मध्यप्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यातील एका गावातून आल्याचे समजले. पोलिसांच्या पथकाने पारस यास ताब्यात घेऊन त्याला पोलिस ठाण्यात नेले. घाबरलेल्या पारस याला धीर देत त्याच्याकडून अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका खूप आवडते आणि त्या मालिकेत काम करण्यासाठी आल्याचे त्याने सांगितले. ६ ऑगस्ट रोजी दुपारी २ च्या सुमारास छिंदवाडा रेल्वे स्टेशन येथून सुपरफास्ट ट्रेन पकडून नागपूर येथे आणि तेथून दुसरी ट्रेन पकडून ७ ऑगस्ट रोजी तो मुंबईत आला. गोरेगाव स्थानकावर उतरून पारस याने चालत चित्रनगरी गाठली.

Maharashtra TimesMaratha Reservation: मराठा आरक्षण सुनावणी लांबणीवर? न्यायमूर्तीच्या संभाव्य बदलीमुळे नवे पूर्णपीठ स्थापन करावे लागण्याची शक्यतापारसने सांगितलेली कथा ऐकल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून वडिलांचा मोबाइल क्रमांक घेतला. वडिलांना फोन करून हटकल्यावर त्यांनी, पारस शाळेत जातो सांगून घरातून बाहेर पडला तो परतलाच नाही. आम्हीच त्याला शोधत असून इकडच्या पोलिस ठाण्यातही तक्रार करण्याच्या तयारीत होतो. आम्ही पारस याला घेण्यासाठी मुंबईत येत असल्याचे त्याच्या वडिलांनी सांगितले. त्यानुसार आरे पोलिसांनी पारस याला सुरक्षित ठेवले.

मुलांकडे लक्ष ठेवा

मायानगरीचे ग्लॅमर ग्रामीण आणि इतर राज्यातील अल्पवयीन मुलांना भुरळ पाडते. अनेकदा मुले परिणामांचा विचार न करता घर सोडून निघून येतात. नागरिकांनी आणि पालकांनी आपल्या मुलांच्या वर्तनावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा