mrunal thakur yashasvi jaiswal spotted in mumbai cafe viral video dating rumours ; मृणाल ठाकूरला डेट करतोय यशस्वी जयस्वाल? एका व्हिडिओने रंगलेल्या चर्चांमागचं सत्य काय?
mrunal thakur yashasvi jaiswal spotted in mumbai cafe viral video dating rumours ; मृणाल ठाकूरला डेट करतोय यशस्वी जयस्वाल? एका व्हिडिओने रंगलेल्या चर्चांमागचं सत्य काय?
Mrunal Thakur Yashasvi Jaiswal Cafe Video : मुंबईतील एका कॅफेबाहेरील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यशस्वी जयस्वाल आणि मृणाल ठाकूर यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण आलं. मात्र, दोघांकडूनही अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : बॉलिवूड आणि भारतीय क्रिकेट यांचं नातं अनेकदा चर्चेत राहिलं आहे. आता अभिनेत्री मृणाल ठाकूर आणि भारतीय संघाचा युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल यांच्या नावाची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. मुंबईतील एका कॅफेबाहेरचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
एका व्हिडिओमुळे चर्चा सुरू
मुंबईतील वांद्रे पश्चिममधील एका कॅफेबाहेरचा हा व्हिडिओ असल्याचं सांगितलं जात आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेकांनी दोघांबद्दल अंदाज बांधायला सुरुवात केली. मात्र, या व्हिडिओमध्ये मृणाल आणि यशस्वी एकत्र दिसत नाहीत. दोघे एकमेकांशी बोलतानाही दिसत नाहीत. तरीही ते एकाच वेळी त्या कॅफेमध्ये असल्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली.
व्हिडिओमध्ये काय दिसतं?
व्हिडिओमध्ये यशस्वी जयस्वाल कॅफेमधून बाहेर पडताना दिसतो. त्याचवेळी मृणाल ठाकूर कॅफेच्या आत असल्याचं दिसतं. दोघांमध्ये कोणताही संवाद झाल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत नाही.
तरीही काही फॅन पेजेसने हा व्हिडिओ शेअर करत दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावा केला. त्यानंतर ही चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली.
दोघांनीही दिलेली नाही प्रतिक्रिया
सध्या मृणाल ठाकूर आणि यशस्वी जयस्वाल रिलेशनशिपमध्ये असल्याची कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. तसेच दोघे डेटवर गेले होते, असंही कुठेही स्पष्ट झालेलं नाही.
दरम्यान, यशस्वी जयस्वाल सध्या भारतीय क्रिकेटमधील उदयोन्मुख स्टार म्हणून ओळखला जातो, तर मृणाल ठाकूर बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. त्यामुळे दोघांच्या नावाची चर्चा सुरू होताच सोशल मीडियावर या व्हिडिओची मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली. मात्र, अधिकृत माहिती समोर येईपर्यंत या चर्चांकडे केवळ अफवा म्हणूनच पाहिलं जात आहे.
व्हायरल व्हिडिओ आणि सुरू असलेल्या चर्चांवर मृणाल किंवा यशस्वी या दोघांपैकी कुणीही अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे सध्या या चर्चा केवळ सोशल मीडियावरील दावे आणि अंदाजांपुरत्याच मर्यादित आहेत.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा