mp praful patel big statement on local body elections 2025; अजितदादांच्या राष्ट्रवादीचा ‘एकला चलो’चा नारा? स्थानिक निवडणुकांबाबत प्रफुल्ल पटेलांचं मोठं वक्तव्य
mp praful patel big statement on local body elections 2025; अजितदादांच्या राष्ट्रवादीचा ‘एकला चलो’चा नारा? स्थानिक निवडणुकांबाबत प्रफुल्ल पटेलांचं मोठं वक्तव्य
Praful Patel: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर खासदार प्रफुल्ल पटेलांनी मोठं वक्तव्य केलं. काय म्हणाले नेमकं?
praful patel2(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, गोंदिया: राज्यसभा आणि लोकसभा निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढणार असलो तरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी उमेदवारी, जागा वाटपाचे निर्णय जिल्हास्तरावर घेण्यात येतील. यातून कार्यकर्त्यांच्या अपेक्षांची पूर्ती करता येईल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे हेवीवेट नेते तथा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केले.
गोंदिया जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला. खासदार पटेल म्हणाले, राज्यात हैदराबाद गॅझेटियरनुसार मराठा समाजाला ओबीसींमध्ये सामावून घेण्याकरिता काढण्यात आलेल्या शासन निर्णयाच्या विरोधात ओबीसी समाज आंदोलन करीत आहे. मात्र त्यांच्या हक्कावर कुठलाच आघात होणार नाही याची काळजी राज्य सरकार घेत आहे. दसरा मेळाव्यावरुन ‘शिमगा’! ठाकरेंनी मेळावा रद्द करुन पैसे पूरग्रस्तांना द्यावेत, भाजपचा उपरोधिक सल्ला हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा निर्णय हा सर्वपक्षीय नेत्यांना सोबत घेऊन करण्यात आला होता. सरसकट देण्याचा प्रश्नच येत नाही. छगन भुजबळ हे आधीपासूनच ओबीसींच्या हक्कासाठी लढा देत आहेत. मंडल आयोगाच्या शिफारसीनुसार ओबीसींना संविधानिक अधिकार मिळाले असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. मुंबईतील सिद्धिविनायक गणपती ट्रस्टकडून माणुसकीचं दर्शन, पूरग्रस्तांना तब्बल 10 कोटींची मदत विरोधकांची टीका राजकारणाचा भाग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्रीद्वय अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा केला आहे. केंद्र सरकारकडे अहवाल सादर करून मदतीची मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदार-खासदारांनी एक महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिले आहे. विरोधकांची टीका ही राजकारणाचा भाग आहे. शिवसेना (उबाठा) चे खासदार संजय राऊत यांना फारसे गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असा टोलाही खासदार पटेल यांनी लगावला.
किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.
शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा