Headlines

Mahesh Tutorials Coaching Classes Shut down 33 branches over state closed amid Financial Problems; प्रसिद्ध ‘महेश ट्युटोरियल्स’ कोचिंग क्लासेस बंद, राज्यातील 33 शाखांना टाळं, विद्यार्थी-पालक संभ्रमात


Mahesh Tutorials Coaching Classes Shut Down : महेश ट्युटोरियल्सची मूळ कंपनी असलेली एम. टी. एज्युकेअर लिमिटेड ही गेल्या काही वर्षांपासून गंभीर आर्थिक अडचणीत असल्याचेही समोर आले आहे.

Mahesh Tutorials Mahesh Shetty Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. खास प्रतिनिधी , मुंबई : महेश ट्युटोरियल्स (एम. टी. एज्युकेअर) या प्रसिद्ध कोचिंग संस्थेने कोणतीही पूर्वसूचना न देता राज्यातील तब्बल ३३ शाखांचे कामकाज अचानक बंद केल्याने हजारो विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

महेश ट्युटोरियल्सची मूळ कंपनी एम. टी. एज्युकेअर लिमिटेड ही गेल्या काही वर्षांपासून गंभीर आर्थिक अडचणीत असल्याचेही समोर आले आहे. कंपनी १६ डिसेंबर २०२२ पासून राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाच्या आदेशानुसार कॉर्पोरेट दिवाळखोरी निवारण प्रक्रियेत आहे. ३० सप्टेंबर २०२५ रोजी संपलेल्या दुसऱ्या तिमाही आणि सहामाहीच्या आर्थिक निकालांवरील स्वतंत्र लेखापरीक्षकांच्या अहवालात कंपनीच्या आर्थिक व्यवहारांबाबत गंभीर आक्षेप नोंदविले आहेत.

दिवाळखोरी प्रक्रिया सुरु

बँका, वित्तीय संस्था, कर्मचारी, वैधानिक प्राधिकरणे आणि इतर कर्जदारांचे दावे अद्याप अंतिम न झाल्याने कंपनीची प्रत्यक्ष देणी किती आहेत, याचे स्पष्ट चित्र उपलब्ध नसल्याचे अहवालात नमूद आहे. कंपनीवर सुमारे ७४.२९ कोटी रुपयांची थकीत कर्जे आणि येणी असून, वाढलेले तोटे, नकारात्मक निव्वळ संपत्ती आणि चालू मालमत्तेपेक्षा अधिक चालू देणी यामुळे कंपनीचे ‘गोइंग कन्सर्न’ म्हणून दिवाळखोरी प्रक्रियेच्या अंतिम निकालावर अवलंबून असल्याचे लेखापरीक्षकांनी स्पष्ट केले आहे.
Maharashtra TimesMumbai Local : CSMT फास्ट लोकलच्या लेडीज फर्स्ट क्लासमध्ये डाऊन मारण्यावरुन वाद, महिलेने सहप्रवाशांवर पेपर स्प्रे फवारल्याने गोंधळ

सर्व शाखांचे कामकाज थांबवले

७ जुलै रोजी शाखाप्रमुखांची बैठक घेऊन १० जुलैपासून सर्व शाखांचे कामकाज थांबविण्याचा निर्णय घेतल्याचे संबंधितांकडून सांगण्यात आले. मात्र, त्याआधीच २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाचे संपूर्ण शुल्क पालकांकडून स्वीकारले होते. वर्ग बंद करताना पर्यायी शैक्षणिक व्यवस्था किंवा शुल्क परताव्याबाबत कोणतीही स्पष्ट भूमिका जाहीर करण्यात आली नसल्याने पालकांमध्ये नाराजी आहे.

Vijay Wadettiwar | नागपुरातून विजय वडेट्टीवार यांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल

शुल्क परताव्याबाबत असमर्थता

काही शाखांमधील विद्यार्थ्यांना इंटिग्रेटेड क्लासमध्ये समाविष्ट होण्याचा पर्याय देण्यात आला आहे. माटुंगा शाखेतील काही पालकांची बैठक घेऊन कंपनी आर्थिक अडचणीत असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर काही दिवस ऑनलाइन वर्ग घेण्यात आले. पुढे विद्यार्थ्यांना दुसऱ्या इंटिग्रेटेड क्लासमध्ये प्रवेश घेण्याचा पर्याय देण्यात आला. मात्र, अनेक पालकांनी शुल्क परताव्याची मागणी केली असता व्यवस्थापनाने आर्थिक असमर्थता दर्शविल्याने त्यांना नाइलाजाने दुसऱ्या क्लासमध्ये प्रवेश घ्यावा लागल्याचे पालकांनी सांगितले.

संस्कृती जीवन आधार फाउंडेशनचे अध्यक्ष प्रदीप मगरे यांनी शासनाकडे सादर केलेल्या निवेदनात या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.
Maharashtra TimesTukaram Mundhe : भिंतीवर बुरशी, डासांचा प्रादुर्भाव; प्रसिद्ध पारसी डेअरीवर FDA चे छापे, गंभीर त्रुटींमुळे परवाना निलंबित

पालकांच्या मागण्या काय?

– शाखा बंद करण्यामागील कारणांची उच्चस्तरीय चौकशी
– पर्यायी शिक्षण व्यवस्था
– न वापरलेला शुल्क परतावा
– शिक्षकांचे वेतन अदा करणे
– खासगी कोचिंग संस्थांसाठी स्वतंत्र नियामक यंत्रणा

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा