Headlines

Kolhapur Dr D Y Patil Death BJP MLA Amal Mahadik meets Congress MLA Satej Patil for condolence; डॉ. डी वाय पाटील यांचं निधन; राजकीय वैमनस्य बाजूला, कट्टर विरोधक भाजप आमदार अमल महाडिक बंटी पाटलांच्या सांत्वनाला


Amal Mahadik meets Satej Patil : भाजपचे कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमल महाडिक यांनी डॉ. डी. वाय. पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत त्यांचे सुपुत्र, काँग्रेस आमदार सतेज पाटील यांचे सांत्वन केले.

Kolhapur D Y Patil Death Amal Mahadik Satej Patil Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
कोल्हापूर : राजकारण, शिक्षण, आरोग्य, अध्यात्म, सहकार आणि समाजकारण अशा विविध क्षेत्रांत आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणारे त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल, पद्मश्री डॉ. डी. वाय. ऊर्फ ज्ञानदेव यशवंत पाटील यांचे कोल्हापुरात निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. सर्वसामान्य शेतकरी ते राज्यपाल असा त्यांचा प्रवास थक्क करणारा आणि इतरांना प्रेरणा देणारा होता. डी. वाय. पाटील यांच्यावर आज, बुधवारी ५ ऑगस्ट रोजी पॅव्हेलियन ग्राउंड, कसबा बावडा, कोल्हापूर येथे दुपारी चार वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

कट्टर वैर बाजूला

भाजपचे कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमल महाडिक यांनी डॉ. डी. वाय. पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. डीवाय यांचे सुपुत्र, काँग्रेस आमदार सतेज पाटील आणि भाजप आमदार अमल महाडिक हे कट्टर राजकीय विरोधक आहेत. मात्र राजकीय वैमनस्य विसरुन अमल महाडिक हे दुःखद प्रसंगी पाटील कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी दाखल झाले आणि त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

डॉ. पाटील यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी आज, बुधवारी सकाळी ११ ते दुपारी चार वाजेपर्यंत त्यांच्या ‘यशवंत निवास’ (कसबा बावडा, कोल्हापूर) येथे ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी चार वाजता अंत्ययात्रा निघणार आहे. सायंकाळी पाच वाजता पॅव्हेलियन ग्राउंड (कसबा बावडा) येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Maharashtra TimesNagpur Crime : लग्नाचा तगादा, 29 वर्षीय प्रेयसीचा 9 मिनिटात काटा काढला, रेल्वे ट्रॅकमनने पोलिसांना सांगितलं, 18 तासात गजाआड

डी वाय पाटलांचा मोठा परिवार

डॉ. डी. वाय. पाटील यांच्या पश्चात मुलगा ‘डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठा’चे कुलपती डॉ. संजय पाटील, माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील, विजय पाटील, डॉ. अजिंक्य पाटील, मुली सुप्रिया चव्हाण-पाटील, भाग्यश्री पाटील, डॉ. नंदिता पालशेतकर, डॉ. प्रिया चोलेरा, राजश्री काकडे, नातू माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. करोनाकाळात डॉ. पाटील यांना थोडा त्रास झाल्यानंतर ते कोल्हापुरातच राहत होते.

हार्ट अटॅकनंतर प्रकृती खालावली

मागील काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती हळूहळू खालावत होती. घरातच त्यांच्यावर उपचार सुरू होते. वीस दिवसांपूर्वी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यातून ते सावरले होते. मात्र, सोमवारी रात्री त्यांची प्रकृती खालावली आणि मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर अंत्यदर्शनासाठी कोल्हापूरसह महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांची रीघ लागली.

Maharashtra TimesFaridabad Teacher Murder : माजी विद्यार्थ्याची घाणेरडी मागणी, सरस्वती स्कूलच्या शिक्षिकेचा नकार, टीचरच्या खुनामागील रहस्याचा उलगडा; दोन मुलांच्या डोळ्यांना आईचा शोध
पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.

डॉ. डी. वाय. पाटील यांच्या पश्चात मुलगा ‘डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठा’चे कुलपती डॉ. संजय पाटील, माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील, विजय पाटील, डॉ. अजिंक्य पाटील, मुलगी सुप्रिया चव्हाण-पाटील, भाग्यश्री पाटील, डॉ. नंदिता पालशेतकर, डॉ. प्रिया चोलेरा, राजश्री काकडे, नातू माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे.