Ketan agarwal lohgad fort death case siya goyal shocking revelation in police investigation; चेतनसोबत संबंध, मग केतनला का अडकवून ठेवलं? पोलीस कोठडीत सियाकडून पहिल्यांदाच धक्कादायक दावा, केतनवरच फोडलं खापर
Ketan agarwal lohgad fort death case siya goyal shocking revelation in police investigation; चेतनसोबत संबंध, मग केतनला का अडकवून ठेवलं? पोलीस कोठडीत सियाकडून पहिल्यांदाच धक्कादायक दावा, केतनवरच फोडलं खापर
पुणे: मावळातील लोहगड किल्ल्यावर हत्या झालेल्या २५ वर्षीय केतन अगरवाल या तरुणाच्या प्रकरणात दिवसागणिक नवनवी माहिती समोर येत आहे. सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांनी मिळून केतनचा निर्दयीपणे जीव घेतला. मात्र सिया गोयल या तरुणीचं चेतनवर प्रेम होतं तर तिने केतन अगरवाल याच्याशी साखरपुडा का केला आणि नंतर त्याला सगळं स्पष्ट सांगण्याऐवजी त्याचा जीव का घेतला, असा प्रश्न वारंवार उपस्थित होत आहे. अशातच आरोपी सियाची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू असून आता तिने नवा दावा केला आहे. साखरपुडा झाल्यानंतर मी केतनला चेतन चौधरी याच्यासोबत सुरू असलेल्या माझ्या प्रेमसंबंधांची माहिती दिली होती, मात्र तरीही तो माझ्याशी लग्न करण्यावर ठाम होता, असं सियाने पोलिसांना सांगितलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केतन अगरवाल आणि सिया गोयल यांचा साखरपुडा फेब्रुवारी महिन्यात झाला होता आणि नोव्हेंबरमध्ये ते दोघे लग्नही करणार होते. या नव्या नात्यामध्ये केतन अत्यंत आनंदी असल्याचं विविध व्हिडिओंमधून स्पष्ट दिसत आहे. आपली होणारी पत्नी सिया हिला खूश करण्यासाठी तो आपल्याकडून शक्य असलेले सर्व प्रयत्न करत होता. मात्र सिया चेहऱ्यावर हास्य दाखवत असली तरी तिच्या डोक्यात मात्र वेगळंच काहीतरी सुरू होतं. सियाने प्रियकर चेतन चौधरी याच्या साथीने कट रचून केतनचा जीव घेतला. सीसीटीव्ही फुटेजमधून याबाबतचं सत्य समोर आल्यानंतर पोलिसांनी सियासह तिचा प्रियकर चेतन चौधरी याला ताब्यात घेतलं असून सध्या दोघेही पोलीस कोठडीत आहेत.
सियाचं म्हणणं नेमकं काय?
सिया गोयल हिने आपला होणारा पती केतन अगरवाल याची हत्या नेमकी कशी केली आणि कोणत्या कारणातून त्याला संपवलं, याबाबत पोलीस कोठडीत तिची चौकशी केली जात आहे. यावेळी तिने सांगितलं की, मी साखरपुडा झाल्यानंतर केतनला सगळं खरं सांगितलं होतं. चेतनसोबत असलेल्या प्रेमसंबंधाची माहिती देत मला तुझ्यासोबत लग्न करण्यात रस नसल्याचं केतनला कळवलं असल्याचा दावा तिने केला आहे. मात्र हे सगळं सांगितल्यानंतरही केतनकडून लग्नाची तयारी सुरूच होती, असं सियाचं म्हणणं आहे. याबाबत ‘हिंदुस्तान टाइम्स’ने पोलीस सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिलं आहे.
दरम्यान, सिया किंवा तिच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याकडून आम्हाला तिच्या आधीच्या प्रेमप्रकरणाबाबत माहिती देण्यात आलेली नव्हती, असा दावा केतन अगरवाल याच्या वडिलांकडून यापूर्वीच करण्यात आला आहे. त्यामुळे आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या चौकशीत पुढील काही दिवसांत नेमकं काय सत्य समोर येतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा