Ketan agarwal deathcase cm devendra fadnavis agrees to fast track trial and appointment of ujjwal nikam; सियाचा पाय खोलात? केतनच्या वडिलांची मागणी, मुख्यमंत्री फडणवीसांकडून तत्काळ होकार, घेतला महत्त्वाचा निर्णय
Ketan agarwal deathcase cm devendra fadnavis agrees to fast track trial and appointment of ujjwal nikam; सियाचा पाय खोलात? केतनच्या वडिलांची मागणी, मुख्यमंत्री फडणवीसांकडून तत्काळ होकार, घेतला महत्त्वाचा निर्णय
म. टा. प्रतिनिधी, पुणे : लोहगडावरील केतन अग्रवाल हत्याकांडाच्या खटल्याची सुनावणी जलदगती न्यायालयात (फास्ट ट्रॅक कोर्ट) चालवण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहमती दर्शवली असून, सरकारची बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. केतनच्या कुटुंबीयांनी केलेली मागणी मान्य करून फडणवीस यांनी विधी व न्याय विभागाला आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश शुक्रवारी दिले.
फडणवीस हे स्वारगेट परिसरातील गणेश कला क्रीडा मंच येथे कार्यक्रमासाठी आले असता मृत केतन अग्रवाल यांचे वडील विशाल देवीचंद अग्रवाल (रा. गहुंजे, पुणे) यांनी फडणवीस यांची भेट घेऊन दोषींना कठोर शिक्षा व्हावी आणि कुटुंबाला लवकर न्याय मिळावा, अशी मागणी केली. या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात व्हावी; तसेच विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. निकम यांची नियुक्ती करावी, असे निवेदन त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले.
या मागणीची तत्काळ दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी विधी व न्याय विभागाच्या सचिवांना आवश्यक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले; तसेच ॲड. उज्ज्वल निकम यांनीही या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहण्यास संमती दर्शवल्याचे या वेळी सांगण्यात आले.
केतन अग्रवाल खुनाच्या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘ही घटना अतिशय धक्कादायक आणि अनाकलनीय आहे. समाज म्हणून या घटनेकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे. चांगल्या घरातील, शिकलेल्या-सवरलेल्या मुला-मुलींमध्ये अशा प्रकारची सूडबुद्धी आणि हिंसक प्रवृत्ती का निर्माण होते, याचा शोध घेणे गरजेचे आहे. या घटनेकडे केवळ गुन्हेगारीच्या दृष्टीने न पाहता तिच्या सामाजिक पैलूचाही विचार करण्याची गरज आहे.’
दरम्यान, ‘तरुण वयात सूडबुद्धी किंवा हिंसक विचार रुजू नयेत, यासाठी समाजाने अधिक संवेदनशील होण्याची गरज आहे. यासाठी सामाजिक पातळीवर उपाययोजनांची गरज आहे,’ असेही ते म्हणाले.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा