कंगना रणौत यांनी ‘जनरेशन झेड’मधील तरुणींना तथाकथित पाश्चात्त्य संस्कृती स्वीकारलेल्या भारतीय तरुणी असे म्हटले आहे. कंगना म्हणाल्या, त्या अभ्यासात तरबेज नाहीत, पण इतक्या कुरूप आणि भ्रष्ट आहेत की त्यांना घरकामसुद्धा सांभाळता येत नाही. तरीही, त्या अमली पदार्थांचे सेवन करण्याचे, दारू पिण्याचे किंवा अनेक व्यक्तींसोबत लैंगिक संबंध ठेवण्याचे स्वातंत्र्य अभिमानाने मिरवतात.
कंगना रणौत नेमकं काय म्हणाल्या?
राणावतने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले, “ज्या स्त्रिया खऱ्या अर्थाने स्वतंत्र असतात, त्या बंडखोर निर्णय घेतात, आपली मते व्यक्त करतात, अपारंपरिक करिअरचे मार्ग निवडतात आणि आपल्या कृतींची जबाबदारी स्वतः घेतात. त्यांना हे करावे लागते कारण त्या एकट्या असतात. त्या हे आपल्या आई-वडिलांना किंवा कुटुंबाला धोक्यात घालून करत नाहीत.”
कंगना रणौत यांचा राग
“जर तुम्ही कोणतीही जबाबदारी न घेता मुक्त जीवन जगण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुम्ही केवळ एक बिघडलेली व्यक्ती आहात,” अशीही टिप्पणी रणौत यांनी केली.
खासदार कंगना रणौत पुढे म्हणाल्या, “ते अमली पदार्थ घेण्याचे, दारू पिण्याचे किंवा अनेक लोकांशी शारीरिक संबंध ठेवण्याचे स्वातंत्र्य मिरवतात, पण प्रत्यक्षात स्वतंत्र न राहता आणि स्वतंत्र जीवन जगण्यासाठी सतत संघर्ष करत, निर्लज्जपणे आपल्या आईवडिलांच्या कमाईवर जगतात.
गटरछाप
मी तुम्हाला एका लहान गोष्टीची आठवण करून देते: स्वतंत्र जीवन कमवावे लागते. जर तुम्ही कोणत्याही जबाबदारीशिवाय स्वतंत्र जीवन जगण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुम्ही फक्त एक बिघडलेली व्यक्ती आहात. गटरछाप.”
हेही वाचा :Woman Molestation | “तुझा रेट काय”? कॅबची वाट पाहणाऱ्या महिलेला छेडल्याप्रकरणी एकास अटक
सोमवारी, कंगना रणौत यांनी कोक्रोच जनता पक्षाची (CJP) खिल्ली उडवली. मंडीच्या खासदार असलेल्या कंगनाने इन्स्टाग्राम स्टोरीजवरील ‘जनरेशन झेड’च्या आंदोलनाच्या व्हिडिओंना किळसवाणे म्हटले आणि त्यांच्यावर टीका केली.
हे कोण तयार करतं?
एका जळजळीत पोस्टमध्ये, कंगना रणौतने आंदोलकांच्या बोलण्याच्या आणि वागण्याच्या पद्धतीची खिल्ली उडवली आहे. तिने लिहिले आहे, “ज्या प्रकारे ते बोलतात आणि जी भाषा वापरतात, माझ्या आयुष्यात प्रत्येक फ्रेममध्ये इतक्या विचित्र आणि अश्लील गोष्टी एकत्र मी कधीही पाहिल्या नाहीत. शी! या लोकांना कोण तयार करत आहे आणि वाढवत आहे?”
सीजेपीने शनिवारी जंतर मंतर येथील आपले ३६ दिवसांचे आंदोलन तात्काळ मागे घेतल्याची घोषणा केली. सरकारने त्यांच्या प्रमुख मागण्या मान्य केल्यामुळे सद्भावनेने आंदोलन संपवत असल्याचे पक्षाने म्हटले आहे. सीजेपीच्या मागण्या मान्य झाल्यानंतर आंदोलनस्थळ रिकामे करण्यात आले.
