Indian student Varun Batchigari accused of strangling US girlfriend Julissa Rubi Salazar arrested at Germany airport Crime News; 19 वर्षीय प्रेयसीचा जीव घेतला, 20 वर्षीय प्रियकराला पळून जाताना विमानतळावर अटक, रिलेशनमध्ये असताना अत्याचाराचा संशय
Indian student Varun Batchigari accused of strangling US girlfriend Julissa Rubi Salazar arrested at Germany airport Crime News; 19 वर्षीय प्रेयसीचा जीव घेतला, 20 वर्षीय प्रियकराला पळून जाताना विमानतळावर अटक, रिलेशनमध्ये असताना अत्याचाराचा संशय
Julissa Rubi Salazar Murder : १९ वर्षीय प्रेयसीचा गळा आवळून खून केल्यानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या २० वर्षीय तरुणाला विमानतळावर अटक करण्यात आली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
वॉशिंग्टन : अमेरिकेतील ॲरिझोना येथे १९ वर्षीय प्रेयसीचा गळा आवळून खून केल्यानंतर अमेरिकेतून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या २० वर्षीय भारतीय तरुणाला जर्मनीमध्ये अटक करण्यात आली आहे. अमेरिकेतील प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार वरुण बाचीगारी याच्यावर महाविद्यालयीन विद्यार्थिनी जुलिसा रुबी सालाझार हिच्या हत्येचा (फर्स्ट-डिग्री मर्डर) संशय आहे. जुलिसाची बॉडी गुरुवारी टक्सन येथील ॲरिझोना विद्यापीठाजवळील तिच्या अपार्टमेंटमध्ये आढळून आली होती.
घरात बेशुद्धावस्थेत सापडली होती
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलिसाबद्दल चिंता वाटल्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी तिची विचारपूस करण्याची विनंती केली होती. टक्सन पोलीस विभागाच्या म्हणण्यानुसार, स्थानिक वेळेनुसार दुपारी ४ वाजताच्या सुमारास अपार्टमेंटवर पोहोचलेल्या अधिकाऱ्यांना ती बेशुद्ध अवस्थेत सापडली. तिच्या शरीरावर जखमेच्या खुणा होत्या.
त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी जुलिसाचा प्रियकर वरुण बाचीगारी याला मुख्य संशयित ठरवण्यात आले आहे. त्याने ज्युलिसाचा फोन आणि क्रेडिट कार्ड्स स्वतःच्या ताब्यात घेतली होती. तिच्या आईला तो मेसेज पाठवत होता.
पोलिसांनी जर्मनीपर्यंत शोध घेतला
वरुण टक्सनमधून पळून गेल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला. तो टक्सन आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेला आणि ह्युस्टनला जाणाऱ्या विमानाने रवाना झाला. तिथून त्याने जर्मनीतील बर्लिनला जाणारे दुसरे विमान पकडले. तो भारतात परतण्याचा प्रयत्न करत असावा, असा पोलीस अधिकाऱ्यांचा अंदाज आहे.
Rent Boyfriend : बॉयफ्रेण्ड भाड्याने हवाय का? कॉफी डेटचे 500, पूर्ण दिवसाचे 4500; तरुणींना भुलवून भलताच प्रकारत्याच्या हालचालींचा मागोवा घेत असतानाच त्याच्या अटकेसाठी वॉरंट जारी करण्यात आले. टक्सन पोलीस विभागाने सांगितले की, वरुण जर्मनीला पोहोचल्यानंतर त्याला शोधून ताब्यात घेण्यासाठी ॲरिझोना प्रशासनाने फेडरल एजंट्ससोबत काम केले. त्याला ॲरिझोनामध्ये परत आणले जाण्याची शक्यता आहे; तिथे त्याच्यावर हत्येचा आरोप ठेवला जाईल आणि त्याला ‘पिमा काउंटी ॲडल्ट डिटेंशन’मध्ये (कारागृहात) ठेवले जाईल.
प्रेयसी रिलेशन संपवण्याच्या विचारात होती
वरुण आणि ज्युलिसा यांच्यातील रिलेशनशिप आणि त्यादरम्यान झालेल्या छळाच्या आरोपांकडेही सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. लैंगिक अत्याचार आणि गैरवर्तनाचा अनुभव आल्यानंतर ज्युलिसा हे नाते संपवण्याच्या विचारात होती.
ज्युलिसाच्या मृत्यूच्या काही दिवस आधी, ५ ऑगस्ट रोजी तिच्या खोलीतून मोठ्याने ओरडण्याचा आवाज ऐकल्यामुळे तिच्या रुममेट्सना चिंता वाटली होती. त्यानंतर रुममेट्सनी ती सुरक्षित आहे की नाही हे पाहण्यासाठी तिच्याशी संपर्क साधला होता. मात्र आपल्याला काही झालं नाही आणि छोटासा वाद झाला होता, असा प्रतिसाद त्यांना मिळाला होता.
आरोपी वरुणची वादग्रस्त पार्श्वभूमी
आरोपी वरुनण बाचिगारी हा ॲरिझोना विद्यापीठात ‘बिझनेस ॲनालिटिक्स’चे शिक्षण घेत होता. मात्र एका हाणामारीनंतर त्याला विद्यापीठातून काढून टाकण्यात आल्याने त्याचा तेथील शैक्षणिक प्रवास अचानक थांबला. त्याच्यावर यापूर्वीही कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झाल्याचे वृत्त आहे.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा